News Flash

उर्वशी रौतेलाचा ‘हा’ ड्रेस डिझाइन करायला लागले १५० तास, किंमत जाणून व्हाल आवाक

तिच्या ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही कायम चर्चेत असते. उर्वशी तिच्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. पण आता एका वेगळ्या कारणासाठी उर्वशी चर्चेत आहे. या चर्चा उर्वशीने परिधान केलेल्या ड्रेसच्या किंमतीमुळे सुरु झाल्या आहेत.

नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी उर्वशी दुबईमधील एका इवेंटमध्ये सहभागी झाली होती. या इवेंटमध्ये तिने केवळ १५ मिनिटे हजेरी लावली. पण या १५ मिनिटांच्या हजेरीसाठी तिने ४ कोटी रुपये मानधन घेतले असल्याचे म्हटले जाते. या कार्यक्रमात तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस लोकप्रिय ड्रेस डिझायनर मायकल सिनकोने डिझाइन केला आहे.

मायकलने उर्वशीच्या या ड्रेसबाबत माहिती दिली आहे. हा ड्रेस डिझाइन करण्यासाठी जवळपास १५० तास लागले असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच या ड्रेसची किंमत जवळपास ३२ लाख रुपये असल्याचा देखील त्याने खुलासा केला आहे.

असे पहिल्यांदाच झालेले नाही की उर्वशीने महागडा ड्रेस परिधान केला आहे. यापूर्वी तिने एका फोटोशूटसाठी परिधान केलेल्या ड्रेसची किंमत ५० लाख रुपये होती. तिने ‘सोल अरेबिया’ या अरबी मॅगझीनसाठी फोटोशूट केले. या मॅगझीनमधील फोटो शेअर करत ती पहिली भारतीय अभिनेत्री आहे जिचा फोटो या मॅगझीनमध्ये छापून आला आहे असे तिने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2021 6:51 pm

Web Title: urvashi rautela dress worth 32 lakh took 150 hours to complete avb 95
Next Stories
1 धनश्री-चहलची हनीमून ट्रिपमध्ये धम्माल मस्ती; व्हिडीओ झाला व्हायरल
2 “यापुढे मिस्टर बीन साकारणार नाही, कारण..”; रोवन एटकिन्सन यांची घोषणा
3 हेअर क्रिमची जाहिरात करणे अभिनेत्याला पडले महागात
Just Now!
X