बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या मादक अदांनी घायाळ करणारी उर्वशी सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असते. यावेळी उर्वशी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चर्चेत आहे. उर्वशीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण देशात सुट्टी जाहिर करावी अशी तिची इच्छा आहे.

काय म्हणाली उर्वशी?

“आजचा दिवस नेहमी पेक्षा फारस सुंदर आहे. आज पृथ्वीवरील सर्वात सुंदर व्यक्तीचा वाढदिवस आहे. अर्थात ती सुंदर व्यक्ती मीच आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशात सुट्टी जाहिर करावी अशी माझी इच्छा आहे.” अशा आशयाची इन्स्टा पोस्ट लिहून उर्वशीने स्वत:ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उर्वशीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.