News Flash

उर्वशीने शेअर केला विराटचा तरुणपणीचा फोटो, चाहत्यांकडे मदत मागत म्हणाली…

जाणून घ्या सविस्तर...

(PHOTO CREDIT: URVASHI RAUTELA INSTAGRAM)

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. सध्या उर्वशीचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आईसोबत स्वयंपाक घरात काम करताना दिसते आहे. पण उर्वशीने विराट आणि त्याच्या आईचा फोटो का शेअर केला? असे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. उर्वशीने फोटो शेअर करत चाहत्यांकडे मदत मागितली आहे.

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विराटचा त्याची आई सरोज कोहली यांच्यासोबतचा स्वयंपाक घरात जेवण बनवतानाचा फोटो शेअर केला आहे. विराटचा हा फोटो तरुणपणीचा असल्याचे दिसत आहे. उर्वशीला हा फोटो तिची आई मीरा रौतेलाने पाठवली आहे. पण आईने हा फोटो का पाठवला? हे जाणून घेण्यासाठी उर्वशीने चाहत्यांकडे मदत मागितली आहे.

आणखी वाचा: २०० कोटी रुपये बजेट असणाऱ्या चित्रपटात आलियाच्या जागी उर्वशीची वर्णी

हा फोटो शेअर करत उर्वशीने ‘मित्रांनो मला तुमच्या मदतीची गरज आहे. माझी आई मीरा रौतेला यांनी मला हा फोटो पाठवला आहे. तुम्हाला काय वाटतं त्यांनी मला हा फोटो का पाठवला आहे? हा फोटो पाठवण्यामागे त्यांचा सीक्रेट हेतू काय असणार? मला भीती वाटू लागली आहे’ या आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.

उर्वशीच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. काहींनी कमेंट करत तिची खिल्ली उडवत म्हटले की तुला रडवण्यासाठी हा फोटो शेअर केला आहे तर काहींनी तुला देखील जेवण बनवता यावे यासाठी शेअर केला आहे अशी कमेंट केली आहे.

लवकरच उर्वशी रौतेला ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ती सध्या या सीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या सीरिजमध्ये उर्वशी अभिनेता रणदीप हूड्डासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. “इंस्पेक्टर अविनाश” ही सीरिज नीरज पाठक दिग्दर्शित करीत आहे. या सीरिजमध्ये पोलीस अधिकारी अविनाश मिश्राची कथा दाखवण्यात येणार आहे. तसेच उर्वशी इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमदान सोबत एका आंतराष्ट्रीय प्रकल्पात काम करणार आहे. दरम्यान उर्वशी “ब्लॅक रोज” आणि “तिरुत्तू पायले 2” च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 11:23 am

Web Title: urvashi rautela mother send her some pictures of virat kohli with his mother in the kitchen avb 95
Next Stories
1 मनोज बायपेयी उलगडणार रहस्य; “सायलेंस-कॅन यू हिअर ईट” सिनेमाचा ट्रेलर रिलीज
2 लोकांच्या नजरेत यावं म्हणून ‘ते’ चित्रपट केले होते, बॉबी देओलचा खुलासा
3 Birthday Special : श्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र
Just Now!
X