07 August 2020

News Flash

“माझा बॉयफ्रेंड ३० फेब्रुवारीसारखा”; उर्वशी रौतेलाने दिलं लग्नाच्या ‘त्या’ फोटोवर स्पष्टीकरण

उर्वशीने केला आपल्या लव्ह लाईफवर खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या तिच्या बॉयफ्रेंडमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तिचं नाव अभिनेता गौतम गुलाटीसोबत जोडलं जात आहे. अलिकडेच दोघांचा लग्न करतानाचा फोटो देखील व्हायरल झाला होता. मात्र या फोटोवर आता उर्वशीने स्पष्टीकरण दिलं आहे. तिचा बॉयफ्रेंड ३० फ्रेब्रुवारीसारखा असल्याचं तिने म्हटलं आहे.

उर्वशीने स्वत:चा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन आपल्या बॉयफ्रेंडबाबत माहिती दिली. “माझा बॉयफ्रेंड ३० फ्रेब्रुवारीसारखा आहे. त्याचं काही अस्तित्व नाही. वर्जिन भानुप्रिया १६ जुलैला प्रदर्शित होईल. ट्रेलर पाहून शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.” अशा आशयाची कॉमेंट तिने या फोटोवर केली आहे.

गौतमसोबत लग्न करतानाचा तो फोटो ‘वर्जिन भानुप्रिया’ या वेब सीरिजमधील आहे. सर्वप्रथम गौतम गुलाटीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो पोस्ट केला होता. “तुम्ही आम्हाला शुभेच्छा देणार नाही का?” अशी कॉमेंटही या फोटोवर लिहिली होती. त्यामुळे चाहत्यांचा गोंधळ आणखी वाढला. परंतु खरं म्हणजे गौतमने उर्वशीसोबत लग्न केलेलं नाही. हा फोटो त्यांच्या आगामी वेब सीरिजमधील आहे. ‘वर्जिन भानुप्रिया’ नावाची एक वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीरिजमध्ये उर्वशी आणि गौतम मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहेत. ‘वर्जिन भानुप्रिया’मधील एका सीनचा फोटो गौतमने पोस्ट केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 12:00 pm

Web Title: urvashi rautela my boyfriend is like the february 30th mppg 94
Next Stories
1 कोरिओग्राफर सरोज खान यांच्या आयुष्यावर येणार बायोपिक?
2 “कमाल आर. खानला अनफॉलो करा”; दिग्दर्शकाची अमिताभ बच्चन यांना विनंती
3 अक्षयच्या ‘बेल बॉटम’चं चित्रीकरण लवकरच; ठरणार लॉकडाउननंतर विदेशात शूट होणारा पहिला चित्रपट
Just Now!
X