07 March 2021

News Flash

हार्दिकच्या साखरपुड्याच्या फोटोवर एक्स गर्लफ्रेंडने केली कमेंट

उर्वशी रौतेलाच्या कमेंटने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. 

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गेले काही दिवस दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. पण तो त्याच्या ‘लव्ह लाईफ’मुळे जोरदार चर्चेत आला आहे. हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवरून आपल्या होणाऱ्या पत्नीच्या नावाची घोषणा केली. ती म्हणजे अभिनेत्री आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टॅन्कोविक. हार्दिकने नताशाला एका प्रायव्हेट बोटीवर समुद्राच्या मधोमध अतिशय रोमँटिक प्रकारे प्रपोझ केलं आणि तिला अंगठी घालत आपण ‘एन्गेज’ झाल्याचं सांगितलं. हार्दिकच्या आयुष्यात कुठली नवी तरुणी डोकावतेय याबाबत कायम उलट सुलट चर्चा सुरू असते. पण हार्दिकने नताशासोबतचा फोटो टाकून थेट चर्चांना पूर्णविराम दिला. त्याच्या या फोटोवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यात त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने केलेल्या कमेंटने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं.

उर्वशीने काय लिहिलं?

तुला साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा.. तुमचं हे नातं प्रेम आणि आनंदाने आणखी खुलू दे. तुम्हाला दोघांनाही पुढील वाटचालीसाठी आणि तुमच्यातील प्रेम असंच टिकून राहावं यासाठी शुभेच्छा..

उर्वशी-हार्दिकचं अफेअर

उर्वशी आणि हार्दिकच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. या दोघांना अनेक पार्ट्यांमध्ये, कार्यक्रमांमध्येही एकत्र पाहिलं गेलं. मात्र या दोघांनी प्रसारमाध्यमांसमोर कधीच कबुली दिली नव्हती.

हार्दिकचं अभिनेत्री एली अवरामशीही जोडलं गेलं नाव

याआधी हार्दिक आणि एली अवरामच्या ‘सिक्रेट डेटिंग’च्या चर्चांनी जोर धरला होता. हार्दिकचा भाऊ कृणालच्या लग्नाला एलीने आवर्जून हजेरी लावली होती. तेव्हापासूनच या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 2:50 pm

Web Title: urvashi rautela on ex boyfriend hardik pandya and natasa stankovic engagement ssv 92
Next Stories
1 बिग बींसह सलमानलाही पडली रिंकूची भुरळ
2 छोट्या पडद्यावरही अक्षयच ‘खिलाडी’; चित्रपटाला मिळाला सर्वाधिक टीआरपी
3 हार्दिक-नताशाच्या फोटोवर बॉलिवूड अभिनेत्याची वादग्रस्त कमेंट
Just Now!
X