09 April 2020

News Flash

VIDEO : सोशल मीडियावर उर्वशीच्या हॉट व्हिडीओचीच चर्चा

तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे

बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती तिच्या भूमिकांपेक्षा सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. देशातील करोना व्हायरचा वाढता संसर्ग बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केले आहे. त्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकार घरात बसून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. मात्र अशातच अभिनेत्री उर्वशी रौतेलाना एक हॉट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नुकताच उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बिकिनी घालूव समुद्रात अंघोळ करताना दिसत आहे. मात्र तिचा हा व्हिडीओ फार जुना आहे. तिने हा व्हिडीओ पुन्हा शेअर करत ‘Me taking bath in quarantine like’ असे कॅप्शन दिले आहे.

उर्वशीचा हा जुना व्हिडीओ असला तरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही दिवासांपूर्वी उर्वशीचा ‘पागलपंती’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जॉन अब्राहम, अनिल कपूर, अरशद वारसी, कृती खरबंदा, पुलकित सम्राट आणि इलियाना डिक्रूज हे कलाकार झळकले होते. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. आता लवकरच उर्वशी एका तामिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुशी गणेशन करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 4:34 pm

Web Title: urvashi rautela share hot bikini video while home quarantine avb 95
Next Stories
1 ‘दारु का कोटा फुल है ना’, असे विचारणाऱ्याला ऋषि कपूरचे भन्नाट उत्तर
2 श्रद्धा कपूरनं दिल्या अस्सल मराठीतून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा
3 Video: केवळ २१ दिवस… आपण सर्व मिळून करोनाविरुद्धची ही लढाई जिंकू
Just Now!
X