News Flash

उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर शेअर केला मोबाईल नंबर, पण…

तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती अनेकदा तिचे हॉट आणि ग्लॅमरस अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. पण आता उर्वशी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. या चर्चा तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये फोन नंबर दिल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट करत फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने हातात बोर्ड पकडला आहे. या बोर्डवर तिने तिचे नाव, उंची, चित्रीकरणाची तारीक आणि फोन नंबर लिहिला आहे. पण मजेशीरबाब म्हणजे उर्वशीने दिलेला फोन नंबर हा आठ अंकाचा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अरब फॅशन विकमधील व्हिडीओ शेअर केला होता. उर्वशी ही ‘अरब फॅशन वीक’ची शोस्टॉपर होती आणि ती बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री आहे जिने हा किताब मिळवला आहे. त्यापूर्वी तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर फर्न अमेटो याच्या आगामी शॉर्ट फिल्ममधील फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ड्रेसची किंमत तब्बल ३७ कोटी रुपये इतकी होती. आता उर्वशीने २२ कॅरेट सोन्याचा मेकअप केल्याचा फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो सध्या चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 4:07 pm

Web Title: urvashi rautela share mobile number on social media avb 95
Next Stories
1 ‘यंदा किल्ल्यांपेक्षा हॅलोविनचेच फोटो जास्त’; देवदत्त नागेने व्यक्त केली खंत
2 नागार्जुनची सून समंथा अक्किनेनी घेते मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद, फोटो व्हायरल
3 संजय दत्तचं उदाहरण देत जॉनी लिव्हर यांनी दिली भारती सिंह ड्रग्ज प्रकरणावर प्रतिक्रिया
Just Now!
X