बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या मादक अदांनी चाहत्यांना कायम घायाळ करत असते. काही दिवसांपूर्वीच उर्वशीचा ‘एक लडकी भीगी भागी सी’ अल्बम रिलीज झालाय. या अल्बमला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. आतापर्यंत 86 लाखांहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेलाय. या अल्बममध्ये उर्वशीचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतोय. तर उर्वशीच्या अदाकारीने अनेकांना वेड लावलं आहे.

नुकताच उर्वशीने या गाण्याचा BTS व्हिडीओ शेअऱ केलाय. या गाण्याचं शूटिंग करत असताना काय तयारी करण्यात आली होती हे यात दिसून येतंय. उर्वशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत लाल साडीतील उर्वशीचा हॉट लूक अनेकांचं लक्ष वेधून घेतोय. उर्वशी पावसात कॅमेरासमोर पोज देताना दिसतेय. या गाण्यातील उर्वशीचे सर्वचं लूक प्रेक्षकांना पसंत पडले आहेत.

व्हिडीओ शेअर करत असताना उर्वशीने एक कॅप्शनही दिलंय. ” महान गायक किशोर कुमार यांच्यासोबत काम करण्याचं मी कायम स्वप्न पाहिलं होतं. त्याच्या सारख्या महान व्यक्तीसोबत माझा आवाज मी शेअर करीन असा विचारही केला नव्हता! स्वप्न पूर्ण झालंय. बॉलिवूडमध्ये किशोर कुमार यांचा आवाज अजरामर आहे.” असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलंय. किशोर कुमार यांच्या ‘चलती का नाम गाडी’ या सिनेमातील हे मुळ गाणं असून ते रिकंपोज करण्यात आलंय. मूळ गाण्यात दिवंगत अभिनेते किशोर कुमार आणि मधुबाला यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.

या अल्बमनंतर उर्वशी लवकरच ‘ब्लक रोज’ या तेलगू सिनेमातून झळकणार आहे. ‘सिंह साब द ग्रेट’ या सिनेमातून उर्वशीने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. त्याचसोबत ‘सनम रे’, ‘हेट स्टोरी’ या सिनेमांमधून उर्वशीची अभिनयाची झलक पाहायला मिळाली.