27 February 2021

News Flash

हार्दिक पांड्याकडून पैसे घेतल्याच्या चर्चांवर उर्वशी रौतेला भडकली

भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या आणि उर्वशीच्या रिलेशनशीपच्या चर्चा माध्यमांत गेल्या वर्षी रंगल्या होत्या.

अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या इन्स्टाग्राम स्टोरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. उर्वशी रौतेला इन्स्टाग्राम स्टोरीतून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यावर चांगलीच भडकली आहे. भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या आणि उर्वशीच्या रिलेशनशीपच्या चर्चा माध्यमांत गेल्या वर्षी रंगल्या होत्या. आता काही प्रसारमाध्यमांनी टाकलेल्या व्हिडीओमध्ये उर्वशी एक्स बॉयफ्रेंडकडून पैसे मागत असल्याचे म्हटले आहे. उर्वशीने अशा बातम्या पसरवणाऱ्यावर इन्स्टाग्राम स्टोरीतून राग व्यक्त केला आहे.

उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवरील स्टोरीवर हार्दिक आणि तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यावर हार्दिक पांड्याकडून उर्वशी पैसे मागत असल्याचा दावा केला आहे. त्या फोटोखाली उर्वशीने आपला संताप व्यक्त केला आहे. ‘मी प्रसारमाध्यमं आणि विविध यूट्युब चॅनेल यांना विनंती करते की, अशा पद्धतीच्या स्टोरी अपलोड करू नका, माझेही कुटुंब आहे. मला माझ्या कुटुंबाला उत्तर द्यावे लागते, असे उर्वशी रौतेलाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहले आहे.’

इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे उर्वशीने खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. गेल्यावर्षी एका पार्टीदरम्यान उर्वशी आणि हार्दिक पांड्याची भेट झाली होती. या भेटीदरम्यानचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. प्रसारमाध्यमांत दोघांच्या अफेअरच्या चर्चाही सुरू होत्या.

याआधी हार्दिक आणि एली अवरामच्या ‘सिक्रेट डेटिंग’च्या चर्चांनी जोर धरला होता. गेल्या वर्षी हार्दिकचा भाऊ कृणालचं लग्न झालं. त्यावेळी एलीने आवर्जून लग्नाला उपस्थिती लावली होती. तेव्हापासूनच या दोघांमध्ये नाते असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 4:27 pm

Web Title: urvashi rautela slams report calling hardik pandya her ex boyfriend nck 90
Next Stories
1 Photo : संजय दत्तच्या वाढदिवशी ‘KGF’कडून खास गिफ्ट
2 ‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारला महिलेनंच केला अश्लील मेसेज
3 Sacred Games 2 : उत्कंठा वाढली, नवीन टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X