News Flash

“आता याला कोणती फॅशन म्हणतात ?”, या व्हिडीओमुळे उर्वशी रौतेला ट्रोल

काही नेटकरी म्हणाले...

अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसते. सोशल मीडियावर उर्वशीचे लाखो चाहते आहेत. उर्वशी तिच्या फॅशन ट्रेंडमुळेही कायम चर्चेत असते. मात्र उर्वशीने नुकताच असा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळे तिला ट्रोल व्हावं लागलं.

उर्वशी रौतेलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटोशूटच्या वेळेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि डोक्यावर हिरेजडीत एक मुखवटा ( Diamond Masquerade) घातल्याचं दिसतंय. तिने घातलेलं हा हिऱ्यांचा मुखवटा खूप भक्कम आणि वजनदार असल्याचं तिने म्हंटलं आहे. हा व्हिडीओ शेअर करताच अनेकांनी उर्वशीच्या फोटोला पसंती दिली, तिचं कौतुक केलं. मात्र काहींनी उर्वशीला तिच्या या लूकवरून ट्रोल केलं आहे.

एका युजरने युर्वशीच्या या फोटोवर ” आता याला कोणती फॅशन म्हणतात कुणी सांगाला आम्हाला.” असं म्हणत ट्रोल केलंय. तर दुसऱ्या युजरने ” नव्य़ा स्टाइलचं हेल्मेट आहे का?काही पण..” अशी कमेंट केली आहे. एक युजर उर्वशीला वेडी झालीय का म्हणाला आहे. काहींनी तर तू IPL च्या कोणत्या टीमला सपोर्ट करतेय असा खोचक टोला तिला लगावला आहे. अनेक युजर्सनी उर्वशीच्या या फोटोवर भन्नाट कमेंट करत तिला ट्रोल केलंय.

(photo-instagram@urvashirautela)

असं असलं तरी उर्वशीच्या लाखो चाहत्यांनी तिच्या या फोटोला पसंती दिली आहे. काही तासातचं तिच्या फोटोला सात लाखांहून अधिक लाईक मिळाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2021 11:34 am

Web Title: urvashi rautela troll after post video in diamond masquerade kpw 89
Next Stories
1 “..आणि ही दुसऱ्यांना शिकवते”; मास्क न घातल्याने सारा अली खान ट्रोल
2 मराठी चित्रपटनिर्मिती व्यवसाय अर्थविवंचनेत 
3 Big Bull Review: सर्वांगांनी धक्के खाल्लेला बैल!
Just Now!
X