करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी २१ दिवस देशात लॉकडाउन करण्यात आला आहे. या काळात सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण घरात आहे. त्यामुळे सध्या विरंगुळ्यासाठी आणि चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सेलिब्रिटी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. यामध्येच अभिनेत्री उर्वशी रौतेलाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मंजुलिकाच्या वेशात दिसत असून तिचा व्हिडीओ चांगलाच चर्चिला जात आहे.
लॉकडाउन असल्यामुळे घरात बसून सारेच कंटाळले आहेत. यामध्ये उर्वशीदेखील कंटाळली असून या दिवसांमध्ये तिची अवस्था कशी झाली आहे हे तिने व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितलं आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘भूलभुलैय्या; चित्रपटातील मंजुलिकाच्या वेशात दिसत आहे. तिचे केस विस्कटलेले आहेत. मेकअप खराब झाला आहे. त्यामुळे तिचा हा लूक चर्चेत आला आहे.
दरम्यान, उर्वशीन शेअर केलेला हा जुना व्हिडीओ आहे मात्र क्वारंटाइन सुरु असल्यामुळे तिने पुन्हा तो शेअर केला आहे. उर्वशी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून तिचे इन्स्टाग्रामवर २.५ कोटी फॉलोअर्स आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 11, 2020 12:58 pm