27 November 2020

News Flash

VIDEO: उर्वशी ५५ लाखांचा ड्रेस घालून करत होती फोटोशूट; तेवढ्यात तोल गेला अन्…

उर्वशीचं अजब फोटोशूट; व्हिडीओ होतोय व्हायरल...

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मादक फोटो आणि व्हिडीओजमुळे ती नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी ती कुठल्याही फोटोमुळे नव्हे तर चक्क एका फोटोशूटमुळे चर्चेत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हे फोटोशूट करताना उर्वशीचा तोल गेला अन् ती खाली बसली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अवश्य वाचा – ‘प्रेम करण्यापूर्वी धर्म पाहायचा का?’; ‘लव्ह जिहाद’च्या कायद्यावर अभिनेता संतापला

 

View this post on Instagram

 

A post shared by Sam Reet (@sam.reet.narula)

अवश्य वाचा – ‘राजा हिंदुस्तानी’मधील किसिंग सीन कसा केला शूट? दिग्दर्शकाने सांगितला अजब किस्सा

उर्वशी पंजाबी रॅपर जस मानक याच्यासोबत फोटोशूट करत होती. हे फोटोशूट करताना तिने तब्बल ५५ लाख रुपयांचा लेहंगा परिधान केला आहे. हाच ड्रेस घालून तिने गायिका नेहा कक्करच्या लग्नात हजेरी लावली होती. हा महागडा पोषाख परिधान करुन ती मानकसोबत एका आराम खुर्चीवर बसून फोटो काढत होती. तेवढ्यात लेहंग्यामध्ये तिचा पाय अडकला अन् तिचा तोल गेला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 4:44 pm

Web Title: urvashi rautela wearing 55 lakh rs lehenga for photoshoot mppg 94
Next Stories
1 पठाणच्या सेटवरील शाहरुखचा लूक व्हायरल; पहिल्यांदाच दिसला नवा अंदाज
2 ‘८ दोन ७५..’; दमदार कथानक असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
3 अक्षय कुमारने ठोकला ५०० कोटींचा मानहानीचा दावा
Just Now!
X