12 December 2017

News Flash

दुसऱ्यांदा आई व्हायला उर्वशी शर्मा सज्ज

तिला समायरा ही तीन वर्षांची मुलगीही आहे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 4, 2017 7:05 PM

उर्वशी शर्मा

अभिनेत्री उर्वशी शर्माकडे गोड बातमी आहे. ती दुसऱ्यांदा आई व्हायला सज्ज झाली आहे. २०१२ मध्ये उर्वशीने सिनेनिर्माता आणि अभिनेता सचिन जोशीशी विवाह केला होता. तिला समायरा ही तीन वर्षांची मुलगीही आहे. नुकताच पुण्यात उर्वशीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पाडला. यावेळी तिने पिवळ्या रंगाचा आणि राखाडी रंगाचा असे दोन ड्रेस घातले होते. या दोन्ही ड्रेसमध्ये उर्वशी कमालिची सुंदर दिसत होती.

अगदी जवळच्या मित्र- मैत्रिणींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात क्रिकेटपटू श्रीशांतने सपत्निक हजेरी लावली होती.
आता उर्वशी पुन्हा आई होणार असल्यामुळे तिच्या घरातही आनंदाचे वातावरण असून आत्तापासूनच उर्वशी आपल्या बाळासाठी अनेक गोष्टींच्या तयारीला लागली आहे.

My little babies. 😍😍😍😘😘😘😘😇😇😇💃🏼💃🏼💃🏼💃🏼💃🏼💃🏼

A post shared by Urvashi Sharrma (@sharrmaurvashi) on

‘नकाब’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या उर्वशीने ‘थ्री’,’खट्टा मीठा’,’आक्रोश’,’चक्रधर’ या सिनेमांतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. पण तिचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपटल्यामुळे तिचे सिनेकरिअरही फार झेप घेऊ शकले नाही. यादरम्यान तिची ओळख सचिनशी झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २०१२ मध्ये सचिनशी लग्न केल्यानंतर कुटुंबाला वेळ देता यावा म्हणून तिने सिनेसृष्टीपासून थोडे दूर राहणे पसंत केले.

My baby shower season 2. 😁😍😘💃🏼🙏🏻😇

A post shared by Urvashi Sharrma (@sharrmaurvashi) on

यानंतर ‘एक माँ जो लाखो के लिए बनी अम्मा’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर आगमन केले होते. या मालिकेत १९७० ते ८० च्या दशकातील मुंबईतील डॉनची भूमिका तिने साकारली होते. पण या मालिकेचे अधिकतर चित्रीकरण हैदराबादमध्ये होत होते. पण यामुळे आपल्या चिमुकलीकडे लक्ष देणे आणि फार काळ तिच्यापासून लांब राहणे शक्य नसल्यामुळे तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.

First Published on October 4, 2017 7:05 pm

Web Title: urvashi sharma is pregnant again check out sweet pictures from her baby shower