News Flash

Video: अमेरिकी दूतावासातील आर्ची, लाल्या, माऊलीची भन्नाट डायलॉगबाजी

अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांचा हा फिल्मी अंदाज पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

भारतीय चित्रपटांचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील अमेरिकी दूतावासाने अत्यंत अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांनी चक्क प्रसिद्ध मराठी भूमिकांचे गाजलेले संवाद म्हटले आहेत.

जेन यांनी सई ताम्हणकरच्या ‘तूही रे’ या चित्रपटातील संवाद म्हटलंय, तर निक यांनी रितेश देशमुखच्या ‘लई भारी’ चित्रपटातील प्रसिद्ध संवाद माऊलीच्या खास अंदाजात म्हटलंय. ‘सैराट’मधल्या आर्चीचाही या व्हिडिओत समावेश आहे. लीन यांनी आर्चीचा डायलॉग तिच्याच अंदाजात म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. तर ‘..आणि काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातील सुबोध भावेचा लाल्याच्या भूमिकेतील गाजलेला ‘एकदम कडक’ डायलॉग रॉब यांनी म्हणून दाखवलाय. अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांचा हा फिल्मी अंदाज पाहून तुम्हीही थक्क व्हाल! या चौघांपैकी सर्वोत्तम कोण होतं असा प्रश्नदेखील त्यांनी व्हिडिओच्या शेवटी विचारला आहे.

आर्ची, लाल्या, माऊली या मराठी चित्रपटसृष्टीतल्या भूमिका प्रेक्षकांना कायम लक्षात राहतील. यासोबतच अमेरिकी दूतावासाने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर या व्हिडिओमधील तुम्हाला आवडलेली व्यक्तीरेखा कोणती?

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 4:30 pm

Web Title: us consulate mumbai tribute to marathi cinema in a unique way
Next Stories
1 नेहा पेंडसेवर का होतोय शुभेच्छांचा वर्षाव?
2 ‘साथ दे तू मला’ मालिकेत नवा ट्विस्ट
3 डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
Just Now!
X