News Flash

चाहत्याने केली न्यूड फोटोची मागणी, अभिनेत्रीने उत्तर देत केली बोलती बंद

सध्या तिची ही पोस्ट चर्चेत आहे.

बॉलिवूड कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. पण कधीकधी या कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जाते. नुकताच अभिनेत्री पूजा हेगडेसोबत देखील असेच काहीसे झाले आहे.

नुकताच अभिनेत्री पूजा हेगडे इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांशी संवाद साधत होती. तिने ‘Post a photo of’ या ट्रेंडमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी पूजाचे कधी न पाहिलेले फोटो पाहायला मिळाले. दरम्यान एका यूजरने तिच्याकडे न्यूड फोटोची मागणी केली होती.

पूजाने या नेटकऱ्याला उत्तर देत पायाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘नंगे पाव’ असे कॅप्शन दिले आहे. पूजाने दिलेले उत्तर पाहून त्या नेटकऱ्याची बोलती बंद झाली असेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

आणखी वाचा- मलायकाने शेअर केला बोल्ड फोटो, सोहेल खानच्या पत्नीने केली कमेंट

पूजा हेगडे ही अतिशय लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिने ‘मोहजोंदारो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आशुतोष गोवारिकर यांच्या या चित्रपटात ती अभिनेता हृतिक रोशनसोबत दिसली होती. आता ती लवकरच सुपरस्टार प्रभास सोबत ‘राधेश्याम’ या चित्रपटात दिसणार आहे. पूजा आणि प्रभासला चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 3:37 pm

Web Title: user asked to post naked photo pooja hedge gave reply avb 95
Next Stories
1 वडिलांच्या इच्छेखातर धर्मेशने केलं ‘हे’ काम
2 प्रेक्षकांसाठी विशाखा सुभेदारचा नवा संकल्प; नव्या वर्षात करणार ‘ही’ गोष्ट
3 Video: लग्नाविषयी विचारताच श्रद्धा कपूरने दिले मराठीत उत्तर, म्हणाली…
Just Now!
X