व. पु. काळे यांच्या कथांची आणि त्यांच्या कथनशैलीची भुरळ कित्येकांना पडते. वपुंच्या क थाकथनाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांचे खास शैलीदार कथन याचि देही याचि डोळा अनुभवण्याचे भाग्य एका पिढीला मिळाले असले तरी तरुण पिढी यापासून वंचित राहिली आहे. वपुंच्या त्यांनीच सांगितलेल्या कथा आता नव्या पिढीला ऑनलाइनवर उपलब्ध होणार आहेत. ‘तरंग ऑडिओ व्हिडीओ प्रॉडक्ट्स’ या कंपनीच्या वतीने ‘वपु ऑनलाइन’ हा पाच सीडींचा संच दिवाळीच्या आधी बाजारात आणण्यात येणार आहे.
वपुंच्या कथाकथनांचे कार्यक्रम सुरू असताना त्याचे ध्वनिमुद्रण करण्यात आले आहे.
या संचातील कथा पूर्णपणे नव्या असून त्या सीडी स्वरूपात पहिल्यांदाच सादर करण्यात येत असल्याचा दावा कं पनीने केला आहे.
‘वपु ऑनलाइन १ – प्रीमिअर, दे हाता’, ‘वपु ऑनलाइन २ – पंगू, अश्शी बायको हवी’, ‘वपु ऑनलाइन ३ – नंदा, शर्मिला, मिडलॅन्डिंग’, ‘वपु ऑनलाइन ४ – स्वप्नवेडी, पिक पॉकेट’ आणि ‘वपु ऑनलाइन – बाप, महाराजा, ऐकावे जनाचे’ असे पाच संच बाजारात येणार आहेत. अधिक माहितीसाठी ९८२२८१९७०९, ९७६२९८१४२६ या क्रमांकांवर संपर्क साधावा.