आपल्या अभिनयाने मराठी व हिंदी सिनेसृष्टीत अभिनेता वैभव तत्त्ववादीने स्वतःचे स्थान निर्माण केले. त्याच्या प्रत्येक सिनेमातील अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करणारा वैभव आपल्या नवीन इनिंगसाठी सज्ज झाला आहे.
वैभवचा अभिनयापासून सुरु झालेला प्रवास त्याला निर्मितीक्षेत्राकडे घेऊन आला आहे. वैभवने आपल्या निर्मितीसंस्थेची स्थापना केली आहे. ‘ऑटम ब्रीझ फिल्म्स’ असे त्याच्या निर्मितीसंस्थेचे नाव आहे. या संस्थेअंतर्गत सिनेमाच्या निर्मिती ते व्यवस्थापन अशी कामे पार पडणार आहेत.
वाचा : ‘साऊथ सेन्सेशन’ विजय देवरकोंडा रणवीरच्या चित्रपटातून करणार बॉलिवूड पदार्पण
याशिवाय वैभवचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी’ हा सिनेमासुद्धा नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात वैभव राणी लक्ष्मीबाई यांच्या लढाऊ तुकडीतील योद्धा पुरणसिंगची व्यक्तिरेखा साकारली आहे. सिनेमात पुरणसिंग यांची पत्नी झलकारी बाईची भूमिका अभिनेत्री अंकिता लोखंडेने साकारली आहे. वैभव आणि अंकिता या जोडीवर एक खास गाणंदेखील सिनेमात चित्रित करण्यात आलं आहे. वैभवने या सिनेमात कंगना रणौत, अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी यांच्यासोबत काम केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 23, 2018 1:06 pm