News Flash

वैभव-पूजाच्या प्रेमाची हटके कहाणी

लांबवर पसरलेल्या पिवळ्या मोहरीच्या फुलांमध्ये एकमेकांमध्ये पूर्णपणे बुडून गेलेले ते दोघं

वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत

प्रेमाच्या प्रवासाचा पहिला थांबा, भेटली तू पुन्हाचा टीझर प्रदर्शित!

दूर डोंगरपल्याड उंच मनोऱ्यात एखादी राजकुमारी प्राण कंठाशी आणून आपली वाट बघत असेल आणि आपण तिची सुटका करू किंवा दुरून कुठूनसा एक राजकुमार घोड्यावर बसून दुडकत, दुडकत येईल आणि आपल्याला घेऊन जाईल अशी स्वप्न आपण प्रत्येकच जण कधी ना कधीतरी बघतो. आजच्या प्रॅक्टिकल जगात ही अगदीच परीकथेतली स्वप्नं वाटली तर मग लांबवर पसरलेल्या पिवळ्या मोहरीच्या फुलांमध्ये एकमेकांमध्ये पूर्णपणे बुडून गेलेले ते दोघं, हे ‘बॉलिवूड’ स्वप्न तर हमखास प्रत्येक जण बघतो. आपल्या जोडीदाराबद्दल प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वप्न असतात आणि आपल्या स्वप्नातल्या त्या व्यक्तीच्या आपण पहिल्या भेटीत प्रेमात पडणार ही खात्री सुद्धा असते.

वाचा : …या सेलिब्रिटी जोडप्यांच्या घरी होणार नव्या पाहुण्यांचे आगमन

‘भेटली तू पुन्हा’चा नायक, आलोकची (वैभव तत्ववादी ) पण आपल्या जोडीदाराबद्दल अशीच काही स्वप्नं आहेत. पण आयुष्याचा प्रवास असा ठरलेला थोडीच असतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भेटली तू पुन्हा’  चित्रपटाच्या टीझर मधून आलोकच्या आयुष्यात आलेले अनपेक्षित वळण आपल्याला बघायला मिळत आहे. आलोकच्या अपेक्षेपेक्षा पूर्णपणे वेगळी ‘ती’ मुलगी (पूजा सावंत) त्याच्या हृदयात कशाप्रकारे स्थान मिळवते हे पहाणं नक्कीच रंजक ठरेल. डोळ्यावर चष्मा असलेल्या पूजाचा डीग्लॅम लूक यामध्ये पाहावयास मिळतो. अगदी वेडगळ, धडपडी आणि काही ना काही गोंधळ घालणारी मुलगी अशी पूजाची व्यक्तिरेखा असल्याचे हा टीजरमध्ये पाहिल्यावर कळते.

वाचा : सुपरस्टार रजनीकांतसह खिलाडी कुमारची हॉलिवूडपेक्षाही उंच भरारी

दुसऱ्या नजरेत घडणाऱ्या प्रेमकथेबद्दल सांगणाऱ्या चंद्रकांत कणसे दिग्दर्शित, स्वरूप रिक्रिएशन अॅण्ड मीडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि सचिन नारकर, विकास पवार निर्मित ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटातून वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत २८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 9:12 am

Web Title: vaibhav tatwawaadi pooja sawant bhetali tu punha teaser
Next Stories
1 …जेव्हा श्रीदेवीची मुलगी डान्स ऑडिशन देते
2 कलेचा वारसा पुढे नेणारी पिढी घडवण्यासाठी मिलिंद शिंदेंचा पुढाकार
3 एका मराठी सिनेमासाठी दगडू काय करतोय हे बघा तरी
Just Now!
X