News Flash

…म्हणून मी तिच्या प्रेमात आहे

एका मुलाखतीमध्ये वैभवने चित्रपटातील अनुभव सांगताना हा खुलासा केला आहे

आपल्या दिलखेचक अदांनी महाराष्ट्रातील तमाम तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी. आता लवकरच वैभव नेटफ्लिक्स ओरिजन चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘त्रिभंग’ असे असून या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री रेणुका शहाणे करणार आहे. तसेच या चित्रपटात वैभवसह अभिनेत्री काजोल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये वैभवने काजोलसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

वैभवने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘त्रिभंग’ चित्रपटातील भूमिका साकारतानाचा अनुभव सांगितला आहे. ‘एक अभिनेता म्हणून मी माझ्या प्रत्येक भूमिकेत वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतो. रेणुका मॅडमने चित्रपट निर्मात्यांना माझे नाव सुचवल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो’ असे वैभव म्हणाला. त्यानंतर त्याने चित्रपटात काजोलसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. ‘काजोलने चित्रपटात ज्या प्रकारे आवाजाचे मॉड्युलेशन केले आहे ते पाहून मी प्रेमात आहे. तसेच चित्रपटाची स्क्रिप्ट वाचत असतानाही तिच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे’ असे वैभव पुढे म्हणाला आहे.

रेणुका शहाणे यांच्या ‘त्रिभंग’ या चित्रपटात काजोल आणि वैभव तत्ववादी मुख्य भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री मिथिला पालकर, कुणाल रॉय कपूर आणि तन्वी आजमी देखील झळकणार आहेत. या चित्रपटात एका कुटुंबामधील १९८० पासून ते आत्ता पर्यंतच्या तीन पिढ्या दाखवण्यात येणार आहेत.

 

View this post on Instagram

 

New project @kajol @ajaydevgnffilms @ajaydevgn @renukash710 @siddharthpmalhotra #Newfilm #vtofficial

A post shared by VAIBHAV TATWAWAADI (@vaibhav.tatwawaadi) on

काजोलचा काही दिवसांपूर्वी ‘हेलीकॉप्टर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. मात्र या चित्रपटानंतर काजोल बराच काळ चित्रपटसृष्टीपासून दूर होती. आता ती पती अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्यानंतर नेटफ्लिक्स ओरिजनल चित्रपटात मराठी कलाकार वैभव तत्ववादीसोबत धमाल करताना दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 2:36 pm

Web Title: vaibhav tatwawaadi talks about kajol i am in love with the way she modulates her voice avb 95
Next Stories
1 लकी अभिनेत्रीचं नाव आयुषमाननं केलं जाहीर
2 …म्हणून युवराज सानियाला म्हणाला ‘हाय हाय मिर्ची’
3 रानू मंडलने केला मेकओव्हर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Just Now!
X