असं म्हणतात सोबत चांगली असली की प्रवासपण चांगला होतो. लांबचा प्रवास, खिडकी जवळची जागा, खिडकीतून दिसणारा पाऊस आणि चांगली सोबत असणं म्हणजे एका परफेक्ट प्रवासाचं परफेक्ट वर्णन. या प्रवासादरम्यान अनेक कथा सुरु झाल्या, काही हुरहूर लावणाऱ्या तर काही आयुष्यभराची सोबत करणाऱ्या! ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाचे पोस्टर पाहिले की प्रत्येकालाच आपापल्या हुरहूर लावणाऱ्या, जुन्या आठवणी जाग्या होतील.

वाचा : ‘सिने’नॉलेज बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अक्षय कुमार कोणते काम करत होता?

Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
Bacchu kadu and navneet rana
“मोठे भाऊही म्हणता, माफीही मागता, तुमच्या एवढा लाचार माणूस…”; बच्चू कडूंची रवी राणांवर बोचरी टीका
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

स्वरूप रिक्रिएशन अॅण्ड मीडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाच्या पोस्टरवरून ‘बबली गर्ल’ भासणाऱ्या पूजा सावंत आणि ‘टॉल अॅण्ड हॅण्डसम’ वैभव तत्ववादी यांची नवीन खुमासदार जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे हे कळते. पोस्टरमध्ये दाखवलेला रेल्वे प्लॅटफॉर्म, रोमॅण्टिक पाऊस, इंद्रधनुष्यासारखा रंगीबेरंगी पूजाचा स्कर्ट आणि पूजा व वैभव यांच्या चेहऱ्यावरचे मिश्कील भाव पाहता यामुळे त्यांच्या या प्रवासाबद्दलची उत्सुकता वाढत आहे.

वाचा : असा असेल ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये कतरिनाचा लूक?

पहिल्या नजरेत होणारे प्रेम आता खूप टिपिकल झाले आहे, दुसऱ्या भेटीत फुलत जाणारे प्रेम अनुभवायचे असेल तर मग येत्या २८ जुलैला ‘भेटली तू पुन्हा’ चित्रपट बघा.

bhetali-tu-punha-poster