News Flash

वैभव तत्ववादीच्या छातीवर महाराजांच्या प्रतिमेचा टॅटू!

शिवरायांवरचे आपले निस्सीम प्रेम दाखवण्याची पुरेपूर संधी वैभवला मिळाली आहे.

वैभव तत्त्ववादी

मराठी माणसाच्या हृदय सिंहासनावर शिवाजी महाराजांचे स्थान अजरामर आहे. महाराजांवरचे हे निस्सीम प्रेम या ना त्या कारणातून व्यक्त करण्याचा प्रयत्न प्रत्येक मराठी माणूस करत असतो. असाच एक हटके प्रयत्न ‘मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी’ च्या ‘मिस्टर सदाचारी’ ने केला आहे. मिस्टर सदाचारी म्हणजेच अभिनेता वैभव तत्ववादी सुद्धा शिवरायांचा मोठा भक्त आहे. शिवरायांवरचे आपले निस्सीम प्रेम दाखवण्याची पुरेपूर संधी त्याला त्याच्या आगामी ‘मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी’  या सिनेमामध्ये मिळाली आहे. या सिनेमासाठी वैभवने चक्क त्याच्या छातीवर महाराजांच्या प्रतिमेचा टॅटू काढला आहे. या टेटूसाठी त्याने एक खास छाप तयार केला असून, शुटींगच्या वेळी तो छाप त्याच्या छातीवर काढण्यात येतो. या छाप्यातून काढलेला टॅटू किमान चार दिवस तरी वैभवच्या छातीवर राहतो. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा हा टॅटू सचिन गुरव यांनी डिजाईन केला आहे. शुटींगदरम्यान हा टॅटू प्रत्येक वेळी त्याच जागेवर काढता यावा यासाठी मेकअपमन आणि स्वतः वैभव विशेष काळजी घेत असल्याच समजत. या टॅटूमुळे वैभवला ‘मॅचो’ लूक आला आहे, या लुकमुळे वैभवला त्याच्या पूर्वीच्या चोकलेट हिरो च्या ईमेज मधून बाहेर पडण्याची संधी मिळाली आहे.
vaibhav tatwawadi 02
‘मिस्टर एंड मिसेस सदाचारी’ सिनेमामध्ये शिवरायांवर आधारित  ‘जगदंब’हे गान देखील चित्रित केल असून, त्या गाण्यात वैभवने नृत्य केल आहे. .शिवरायांचे गौरवगान सादर करणार हे गान पंकज पडघम यांनी संगीतबद्ध केले असून या गाण्यासाठी वैभवने जवळपास आठवडाभर तालीम केली होती. या सिनेमात वैभवसोबत प्रार्थनाही झळकेल. इंडियन फिल्म्स स्टुडियोज निर्मित आणि आशिष वाघ दिग्दर्शित  ‘मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 1:05 am

Web Title: vaibhav tatwawadi in mr and mrs sadachari
Next Stories
1 अहमदनगर महाकरंडकचा भरत जाधव ब्रँड अँबेसिडर
2 माझा वाढदिवस साजरा करू नका- रजनीकांत
3 अमिताभ, सलमान, इरफान सर्वोत्कृष्ट कोण?
Just Now!
X