News Flash

सलमानला नृत्यदिग्दर्शनासाठी नॉमिनेशन दिले, त्यावर वैभवीने उडवली खिल्ली

फिल्मफेअर पुरस्कारांची चर्चा चुकीच्या कारणांसाठी जास्तच होते

सलमानला नृत्यदिग्दर्शनासाठी नॉमिनेशन दिले, त्यावर वैभवीने उडवली खिल्ली
वैभवी मर्चंट आणि सलमान खान

यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारांची चर्चा ही चांगल्या कारणांसाठी कमी आणि चुकीच्या कारणांसाठी जास्तच होत होती. याची सुरुवात आधी अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट आणि रुस्तम यांपैकी एकाही सिनेमाला नामांकन दिले नाही यावरुनच झाली.

त्यानंतर हर्षवर्धन कपूरनेही फिल्मफेअरमध्ये देण्यात आलेल्या पुरस्कारांवर नाराजी व्यक्त केली होती. सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार (पुरुष) या विभागासाठी हर्षवर्धनला पुरस्कार न देता तो दिलजीत दोसांजला देण्यात आला होता. यासंदर्भात त्याने आपले मत व्यक्त केले होते.
आता नृत्यदिग्दर्शिका वैभवी मर्चंट हिनेही या पुरस्कारांबाबत आपले मत व्यक्त केले आहे. तिने उपरोधितपणे फिल्मफेअर पुरस्कारासंदर्भात एक ट्विट केले आहे. यात ती म्हणते की, जर सलमान खानला जग घुमियो या गाण्याच्या नृत्य दिग्दर्शनासाठी नामांकन देण्यात येत असेल तर मलाही सुलतान या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता या विभागात नामांकन मिळायला हवे.

Next Stories
1 अभिनेत्री रिमी सेनही आता भाजपमध्ये
2 प्रदर्शनापूर्वीच शाहरुखचा ‘रईस’ तोट्यात?
3 यशवंत चित्रपट महोत्सवात दिग्गजांची मांदियाळी
Just Now!
X