News Flash

वैदेही परशुरामीच्या घरी ‘या’ नव्या पाहुणीचं स्वागत; नव्या वर्षाची नवी सुरुवात

फोटो शेअर करत म्हणाली...

13 एप्रिलला गुढीपाडव्याच्या निमित्ताने अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. नव्या वर्षाच्या या कलाकारांनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवं वर्षाच्या निमित्ताने अनेक जण विविध वस्तूंची खरेदी करत असतात. अभिनेत्री वैदेही परशुरामीनेदेखील या नव्या वर्षात एक नवी सुरुवात केली आहे.

अभिनेत्री वैदेही परशुरामीने नवं वर्षाच्या निमित्ताने कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने तिचा आनंद व्य़क्त केला आहे. ” रथ-सारथी,… नवं वर्ष..नवी सुरुवात..घरी स्वागत आहे.” असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. वैदेहीने तिची स्वत: पहिली कार घेतल्याने तिला चांगलाच आनंद झाला आहे. वैदेहीच्या या फोटोवर अभिनेत्री अमृता खानविलकरने कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेक चाहत्यांनीदेखील वैदहीला नव्या कारसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

वैदेही लवकच ‘झोंबिवली’ या सिनेमात अमेय वाघ आणि ललित प्रभाकर यांच्यासोबत झळकणार आहे. वैदेहीने ‘वेड लागी जीवा’ या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय.तसचं रणवीर सिंहसोबत वैदेहीनी ‘सिम्बा’ सिनेमात महत्वाची भूमिका साकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 12:31 pm

Web Title: vaidehi parshurami bought new car share happiness on social media by shearing car photo kpw 89
Next Stories
1 माधुरी दीक्षित सोबत नोरा फतेहीचे ठुमके!; एकाच मंचावर दोन डान्सिंग क्विन
2 “कलाकारांच्या मतांना कधीपासून एवढी किंमत आली?”, ‘या’ अभिनेत्रीचा माध्यमांना सवाल!
3 ‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावेचा ‘मानापमान’ रुपेरी पडद्यावर
Just Now!
X