09 March 2021

News Flash

‘आईच्या हातात बिग बॉसची ट्रॉफी पाहाणं हेच बर्थडे गिफ्ट’,म्हणतेय वैशाली माडेची मुलगी

आपल्या मुलीचा वाढदिवस दरवर्षी थाटात साजरा करणारी वैशाली यंदा मात्र मुलीपासून दूर असणार आहे.

वैशाली माडे, आस्था

महागायिका वैशाली माडे बिग बॉसच्या घरातली एक स्ट्रॉंग स्पर्धक आहे. बिग बॉसच्या घरात सध्या तिची यशस्वी घोडदौड सुरू असताना, तिच्या मुलीचा वाढदिवस जवळ आला आहे. आपल्या मुलीचा वाढदिवस दरवर्षी थाटात साजरा करणारी वैशाली यंदा मात्र मुलीपासून दूर असणार आहे.

१९ जुलैला वैशालीच्या मुलीचा, आस्थाचा वाढदिवस आहे. जुलै महिना सुरू झाल्यावर वैशालीने यंदा आपण आस्थासोबत नसल्याची बिग बॉसमध्ये खंत व्यक्त केली होती. वैशाली म्हणाली, “आस्थाचा वाढदिवस असलेला महिना आता सुरू झाला आहे. दरवर्षी न चुकता तिचा वाढदिवस मी साजरा करते. यंदा ती अकरा वर्षाची होणार आहे. अकरा वर्ष कशी गेली कळलंच नाही. असं वाटतंय, ही चिमुकली आताच तर जन्माला आली होती. मी घरात असताना नेहमी माझ्या मागेपुढेच असते. आता यंदा ती कशी साजरा करेल तिचा वाढदिवस ?”

ह्यावर वैशालीच्या मुलीने तिच्यासाठी एक मेसेज रेकॉर्ड केलाय. आस्था म्हणते, “आईने आतापर्यंतचा माझा प्रत्येक वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला आहे. वाढदिवसाच्यावेळी कोणतेही शो किंवा रेकॉर्डिंग न ठेवता ती माझ्यासोबतच वेळ घालवायची. यंदा मात्र मी तिला खूप मिस करेन. पण आई तू माझी काळजी करू नकोस. आजी यंदा माझा वाढदिवस साजरा करणार आहे. तू असंच चांगलं खेळत रहा. स्ट्राँग रहा आणि १ सप्टेंबरला मला तुझ्या हातात ट्रॉफी पाहायचीय.”

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 3:26 pm

Web Title: vaishali mhade big boss marathi daughter birthday djj 97
टॅग : Bigg Boss Marathi
Next Stories
1 अभिनेत्री पूजा बत्रा विवाहबंधनात, सेक्रेड गेम्समधील ‘या’ अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ
2 Photo : समीरा रेड्डीला कन्यारत्न!
3 Video : अंडरवॉटर शूटनंतर समीराने शेअर केला नवा व्हिडीओ
Just Now!
X