23 October 2019

News Flash

दोन गायिका एकत्र पण भूमिका मात्र वेगळ्या

असं म्हटलं जात की दोन गायिका हया चांगल्या मैत्रिणी असू शकत नाही.

| April 24, 2015 02:15 am

असं म्हटलं जात की दोन गायिका हया चांगल्या मैत्रिणी असू शकत नाही. पण इथे मात्र आपल्याला चित्र वेगळचं दिसतंय, इथे तर एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीच्या आगामी सिनेमासाठी चक्क गाण गातेय. वैशाली सामंत आणि नेहा राजपाल हया दोघीही गायिका असूनही अगदी खास मैत्रिणी आहेत. हयाच मैत्रीखातर वैशाली नेहा राजपाल यांच्या आगामी सिनेमासाठी एक गाण गाणार आहे. नेहा राजपाल जितक्या चांगल्या गायिका आहेत तितक्याच त्या निर्मात्या म्हणून यशस्वी होतील अशी खात्री वैशाली यांना आहे.  

First Published on April 24, 2015 2:15 am

Web Title: vaishali samant will sing for vaishali neha rajpal
टॅग Marathi Movie