09 December 2019

News Flash

स्त्री जीवनावर भाष्य करणारा ‘व्हूज नेक्स्ट’? लवकरच प्रदर्शित

अभिनेत्री रुपाली भोसले मुख्य भूमिकेत असून हा एक सस्पेन्स थ्रिलर लघुपट आहे

प्रेमाचा गुलाबी रंग प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. खास करून व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तर हा रंग खूपच बहरतो. मात्र या रंगाला बट्टा लावणाऱ्या अनेक घटना समाजात घडतात. प्रेमभंग आणि फसवणुकीमुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त होते, त्यामुळेच तर प्रेम करा पण जरा जपून, असंच काहीसं अभिनेत्री रुपाली भोसले आपल्या लघुपटाद्वारे सांगणार आहे. ‘व्हूज नेक्स्ट’ या लघुपटाद्वारे ती प्रेक्षकांसमोर येत आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत असलेला हा एक सस्पेन्स थ्रिलर लघुपट आहे. या लघुपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिजित चौधरी यांनी घेतली असून त्यांनीच या लघुपटाचं लेखन केलं आहे.

स्त्रीप्रधान असलेल्या या लघुपटात रुपालीने मायरा नावाची व्यक्तीरेखा साकारली आहे. या लघुपटाद्वारे आम्ही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे तिने सांगितलं. हा लघुपट येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बलात्कार, ऍसिड हल्ला, छेडखानी यांसारख्या घटना वाढत आहे. अशावेळी पीडित मुलीने काय करावं? वर्षानुवर्षे कायद्याच्या कचाट्यात अडकून न्यायाच्या प्रतीक्षेत बसावं, कि अजून काही ठोस पाऊलं उचलावी ? यावर हा लघुपट भाष्य करणार आहे. प्रेम आंधळे नव्हे तर डोळस करण्याची आवश्यकता असल्याचा संदेश या लघुपटातून रुपाली देणार आहे.

First Published on February 11, 2019 6:46 pm

Web Title: valentine day release hows next marathi documentary
Just Now!
X