व्हॅलेंटाइन डे म्हणजे एक असा दिवस ज्या दिवसाची अनेकजण आतुरतेने वाट पाहात असतात. अर्थात या अनेकजणांमध्ये वयाची, जाती धर्माची, रंगवर्णाची अशी कोणतीही मर्यादा नसते हेच खरं. प्रेमाचा उत्साह, प्रेमाचा रंग आणि एका वेगळ्याच जगताची सुखद अनुभूती देणारा हा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. प्रत्येकाच्या जीवनात एकदातरी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात, वचनांची देवाणघेवाण होते आणि थोडेसे रुसवे फुगवेही असतातच. तुमच्या आमच्याप्रमाणेच कलाकारांच्या प्रेमाचेही असेच काहीसे किस्से आणि तारखांमध्ये गुंतलेल्या प्रेमाच्या आठवणी आहेत. सेलिब्रिटींच्या याच काही सुरेख आणि अविस्मरणीय आठवणींचा ठेवा आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने यंदा सेलिब्रिटींच्या प्रेमाच्या गावी एक फेरफटका मारायलाच हवा… चला तर मग साजरा करुया उत्साह प्रेमाचा.

मी आणि पियुषने खूप आधी इ टीव्ही मराठीच्या एका कार्यक्रमासाठी एकत्र परफॉर्मन्स सादर केला होता. त्यामुळे आमची ओळख होतीच. पण त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये आम्ही पुन्हा भेटलो ते अस्मिताच्या सेटवर मढच्या एका स्टुडिओ मध्ये. अस्मितामध्ये साकारलेल्या ऑन स्क्रीन जोडीवर लोकांनी भरभरून प्रेम केलं. मी आणि पियुष अस्मिता या मालिकेमुळे खूप जवळचे मित्र झालो. आमची एकदम घट्ट मैत्री झाली होती. गेल्या वर्षी जेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही दोघं एकमेकांना छान समजून घेतोय, आम्ही खूप छान मित्र झालोय तेव्हा आम्हाला कळलं की आपण एकमेकांसोबत आयुष्य घालवू शकू. आणि म्हणून आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. आम्ही आधीपासून खूप चांगले मित्र असल्यामुळे साखरपुडा  झाल्यानंतर एकत्र काम करताना आम्हाला काही वेगळं वाटत नव्हतं. पण इतरांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला त्यामुळे आम्ही ही फेज खूप एन्जॉय केली.

prarthana behere says she and her husband do not want child
“आम्हाला मूल नको, कारण…”, प्रार्थना बेहेरेचा वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा; म्हणाली, “माझे सासू-सासरे…”
karma hit back on young boys who messed with the cow
Video : गायींबरोबर पंगा घेणे तरुणाला पडले चांगलेच महागात, थेट हवेत उडवले अन्…, व्हिडीओ होतोय व्हायरल
a child girl dance on krishnas bhajan in satsang
VIDEO : चिमुकलीने कृष्णाच्या भजनावर केले नृत्य, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “याला म्हणतात संस्कार…”
mundu-clad gang boys dance on lungi shirt
Video : लुंगी शर्टवर तरुणांनी केला झकास डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल