03 December 2020

News Flash

‘डॉक्टर डॉन’मध्ये ऐन पावसाळ्यात साजरा होणार अनोखा ‘व्हॅलेंटाईन्स डे’

झी युवा वाहिनीवरची डॉक्टर डॉन ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच गाजतेय.

झी युवा वाहिनीवरची डॉक्टर डॉन ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच गाजतेय. नेहमीच्या सासू सुनांच्या नातेसंबंधांपेक्षा वेगळी अशी या मालिकेची कथा असल्याने अल्पावधीतच मालिका घराघरापर्यंत पोहोचली आणि आता तर या मालिकेमध्ये लव्हस्टोरी सुरु झालीये आणि तीही मालिकेमधल्या महत्वाच्या व्यक्तिरेखा देवा आणि डॉ मोनिका यांच्यामध्ये.

देवाच्या लाडक्या डॉलीबाईंना प्रपोज करण्यासाठी देवाने जय्यत तयारी केलीये. डॉलीबाई किती स्पेशल आहेत हे त्यांना जाणवून देण्यासाठी देवाने आत्तापर्यंत अनेक आगळ्या वेगळ्या गोष्टी केल्यात आणि आता पहिल्यांदाच आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी देवा एकदम अनोख्या पद्धतीने सज्ज झालाय. विशेष म्हणजे यासाठी मालिकेच्या क्रिएटीव्ह टिमने व्हॅलेंटाईन्स डे किंवा कुठल्याही खास दिनाची वाट न पाहता चक्क सप्टेंबर महिन्यातच प्रेमाचं रोमहर्षक वातावरण तयार करायचं ठरवलंय.

सध्या या पावसाळी व्हॅलेंटाईन्स डेचा खास प्रोमो झी युवा वाहिनीवर पहायला मिळतोय. पण या अनोख्या व्हॅलेंटाईन्स डेचा संपुर्ण अनुभव प्रेक्षकांना डॉक्टर डॉन ही मालिका पाहताना घेता येईल. ही मालिका झी युवा वाहिनीवर रोज रात्री नऊ वाजता प्रसारित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 1:50 pm

Web Title: valentines day celebration in doctor don serial ssv 92
Next Stories
1 ‘खाली पीली’मधील नवे गाणे प्रदर्शित होताच डिसलाईकचा भडीमार
2 शौविक चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये वाढ; NCBने केली खास मित्राला अटक
3 “बॉलिवूडमध्ये दोन मिनिटांच्या रोलसाठी…,” जया बच्चन यांना प्रत्युत्तर देताना कंगनाचा नवा आरोप
Just Now!
X