21 September 2020

News Flash

Valentines Day 2017 : आई-बाबा आणि साईबाबा शपथ, सई तू आपल्याला जाम आवडते…

'सुई' टोचली तरी आई म्हणण्यापेक्षा 'सई' म्हणणारा मी..

तू फक्त बिकीनीतच नाही तर, साडीमध्येही 'हॉट'नेस लपवू शकत नाहीस.

‘ये मेरा प्रेम पत्र पढकर तुम टाइमपास मत समझना…’ अशी सुरुवात केली खरी; पण विचार आला मराठी नारीला हिंदी भाषेतून सुरुवात खरंच भारी वाट्टेल का? ही शैली तुला आवडेल का? मनात गोंधळ निर्माण झाल्यावर डोळे बंद केले. अन् तुझी छबी दिसताच ट्यूब पेटली. आयला!…सईला पत्र लिहताना यापेक्षा वेगळी सुरुवात असूच शकत नाही. बॉलिवूडची शैली तू मराठीमध्ये ज्या तोऱ्यात आणलीस, त्या अर्थी तुला हिंदीची ‘अॅलर्जी’ नसल्याचे पक्के झाले. थोडक्यात सुरुवातीला माती खाल्ली नसल्याचा पक्का विश्वास बसला.  प्रेमाला उपमा नाही असं म्हणतात, हे तर तुला ठाऊकच असेल; पण मी याबाबतीत थोड्या वेगळ्या विचारांचा मानव आहे. कारण पत्र लिहिताना तुला काही उपमा दिली नाही तर, प्रेमात ‘हॉट’पणा नसल्यासारखंच होईल नाही का? बरं प्रेम व्यक्त करण्यापूर्वी थोडक्यात माझी ओळख करुन द्यावीशी वाटते. तसा मी तुला सोशल मीडियावर फॉलो करतो. पण सई ताम्हणकर नावाची क्रेझ दिवसागणिक इतकी वाढताना दिसते की, तुझ्याशी संवाद होणे कठीणच. त्यातही तिथं थोडक्यात व्यक्त व्हावं लागतं. त्यात तुझ्यावर असलेलं प्रेम हे चार शब्दांत व्यक्त करण्यासारखं तोकडं नाही. त्यामुळं या पत्रातून मला अधिक व्यक्त होता येईल, असं वाटलं.

मी तसा स्वत:ला सेमी मॉडर्न पिढीतील असल्याचं मानतो. याचं कारण तुझी अदा पाहताना मला काही पथ्ये पाळावी लागतात. एक म्हणजे तू ज्या चित्रपटात दिसतेस त्या मराठी चित्रपटाला ‘हॉटनेस’ हा शब्द आपसूक जोडला जातो. त्यामुळे तुला पाहताना बाबा, डोळे फाडून बघ! असा टोमणा मारतील याची कुठंतरी भीती असते. आई बोटे मोडत किचनमध्ये जाताना तुला फाटक्या कपड्यातील ‘अवदसा’ म्हटली तर, ते सहन करण्याची माझी क्षमता नाही. दादा-वहिनी मॉडर्न असले तरी त्यांना बॉलिवूडची फॅशन मराठीत आल्याचं रूचत नाही. अर्थातच या सर्वांसमोर मी तुला न्याहाळून पाहू शकत नाही. सई तुला सांगतो, रिमो़टवर चॅनेल कंट्रोल करणं शक्य नसतं ना तर तुला या मंडळीच्या सहवासात पाहण्याची धडपडदेखील करु शकलो नसतो. सुदैवाने हे यंत्र मला तुला चोरून बघण्यासाठी मदत करते.

फक्त घरची अवस्था तुझ्यावरच्या प्रेमाच्या आड येत असती तर ठीक आहे. पण मित्रांमध्ये सुद्धा तुझा विषय काढणे अथवा त्यांच्यासोबत तुझा चित्रपट पाहायला जाणे अवघडल्यासारखं वाटतं. ते तुला चक्क ‘फटाका’ म्हणून संबोधतात. हे ऐकल्यावर माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. त्यांच्या कानाखाली फटाक्यांचा आवाज काढावा, असा विचार मनात येतो. पण पुन्हा भानावर येतो अन् त्यांची काय चूक नाही असं मला मान्य करावं लागतं. तू फक्त बिकीनीतच नाही तर, साडीमध्येही ‘हॉट’नेस लपवू शकत नाही. अर्थात तो लपत नाही असं म्हणायला हवं. कारण तुझ्या ‘हंटर’ चित्रपटात मला त्याची चांगलीच प्रचिती आली. आता तुझ्या हॉटनेस अंदाजावर वायफळ बडबड करणाऱ्यांची मला कधी-कधी कीव येते. बॉलिवूडला फॅशन म्हणणारे तुला ‘फाटक्या कपड्यातील’ कसे म्हणू शकतात? किंवा तुला संस्कृतीचे भान नाही, असे त्यांना का वाटते?  हे आतापर्यंत न सुटलेलं कोडं. तू हॉटनेसच्या अदाकारीने ओळख निर्माण केली आहेस हे खरं आहे. पण या लोकांना एवढंच कस दिसते.

तुझ्या अभिनयाबद्दल बोलायला मी काही  समीक्षक नाही. पण एवढं नक्की सांगेन की, तुझी संवादफेक लाजवाब असते. तुला मी आधीच म्हटलं होतं की तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करताना उपमा दिली नाही तर, या प्रेमपत्रात हॉटनेसपणा कसा येणार? पण तुझ्या हॉटनेसला खरचं काय उपमा देऊ कळत नाही. सध्या तुझी ओळख तर हीच आहे. पण मला जेवढं कळतं तेवढंच मी बोलतो. लोकांप्रमाणे तुझ्या हॉट अंदाजावर कमेंट करण्यापेक्षा मी तुझ्या संवादावर बोलणं पसंत करेन. कारण तुझ्याकडे आकर्षित करणार प्रेम तुझ्यातील त्या संवाद कौशल्यामुळंच जडलंय. सई तुझा ‘क्लासमेट’मधला तो संवाद आठवतोय का? तोच गं.. चड्डीत रहायचं ! कळलं ना? तुझा हा संवाद ऐकताना तू मला कोल्हापूरची ‘लवंगी मिरची’ आहेस असंच वाटलं. म्हणजे आमच्या  कोल्हापुरात बिनधास्त अंदाजात समोरच्याला खाली मान घालायला लावणाऱ्या पोरींना कोल्हापुरची ‘लवंगी मिरची’ असं म्हणतात. तू तिकडची नसलीस तरी अगदी तशीच आहेस. सर्वांना ठसका देणारी तिखट मिरची….

‘सुई’ टोचली तरी आई म्हणण्यापेक्षा ‘सई’ म्हणणारा तुझा चाहता…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 1:45 am

Web Title: valentines day special a fan wrote love letter to marathi actress sai tamhankar
Next Stories
1 Valentines Day 2017 : .. अशी होती आदिनाथ-उर्मिलाची पहिली डेट
2 सेलेब्रिटी लेखक : आणि कायो भेटला..!
3 संजूबाबाच्या डोक्यात हा विचारही घोळायचा
Just Now!
X