व्हॅलेंटाइन डे म्हणजे एक असा दिवस ज्या दिवसाची अनेकजण आतुरतेने वाट पाहात असतात. अर्थात या अनेकजणांमध्ये वयाची, जाती धर्माची, रंगवर्णाची अशी कोणतीही मर्यादा नसते हेच खरं. प्रेमाचा उत्साह, प्रेमाचा रंग आणि एका वेगळ्याच जगताची सुखद अनुभूती देणारा हा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. प्रत्येकाच्या जीवनात एकदातरी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात, वचनांची देवाणघेवाण होते आणि थोडेसे रुसवे फुगवेही असतातच. तुमच्या आमच्याप्रमाणेच कलाकारांच्या प्रेमाचेही असेच काहीसे किस्से आणि तारखांमध्ये गुंतलेल्या प्रेमाच्या आठवणी आहेत. सेलिब्रिटींच्या याच काही सुरेख आणि अविस्मरणीय आठवणींचा ठेवा आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने यंदा सेलिब्रिटींच्या प्रेमाच्या गावी एक फेरफटका मारायलाच हवा… चला तर मग साजरा करुया उत्साह प्रेमाचा.

mrunal-07

Hansal Mehta relationship with Safeena Hussain
“मी घटस्फोटानंतरही पहिल्या पत्नीवर अंत्यसंस्कार केले”, हंसल मेहतांचा खुलासा; मुलींच्या जन्मानंतर सफीनाशी दोन वर्षांपूर्वी केलं लग्न
akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक

मी खरंतर व्हॅलेन्टाइन टाईप नाहीये. माझं आणि नीरजचं लग्नही चांगलं कांदेपोहे स्टाईलचं आहे. अरेंज्ड मॅरेज करताना मनात एक धाकधूक होती. माझ्या बहिणींचे अरेंज्ड मॅरेजेसचे अनुभवही होते. त्यामुळे अरेंज्ड मॅरेजच्या एकूणच प्रोसेसची कल्पनाही होती. पुण्याला त्याच्या घरी आम्ही भेटलो. मी स्वभावाने जरा घाबरी आहे. पण, नीरजला भेटल्यानंतर आमचं ट्युनिंग छान जमत गेलं. त्यामुळे आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आमची भेट झाल्यानंतर सहा महिन्यांनी आमचं लग्न ठरलं. गेल्या वर्षी २५ फेब्रुवारीला आमचं लग्न झालं. त्यामुळे गेल्या वर्षीच्या व्हॅलेंटाइन डे ला आमची लगीनघाई सुरू होती. खरेदीची लगबग होती. लग्न ठरल्यानंतरच्या गाठीभेटी होत्या. त्यातही एक वेगळी उत्सुकता होती. यावर्षी नीरज अमेरिकेत आहे. त्यामुळे यावर्षीचा व्हॅलेंटाइन डे गेल्या वर्षीच्या आठवणीतच सेलिब्रेट होणार आहे. पण,  मला त्यातही एक वेगळं समाधान वाटतंय. कारण, जोडीदार म्हणून नीरज खूप समजूतदार आहे. मी अशा क्षेत्रात आहे, जिथे खूप असुरक्षितता आहे. नीरजचं विश्वं यापेक्षा वेगळं आहे. पण, नीरजने मला, माझ्या क्षेत्राला अगदी छान समजून घेतलंय. लग्नाच्या पहिल्या वर्षी असं बायकोपासून दूर राहणं खूप कमी मुलांना जमतं. म्हणून मला वाटतं की मी खूप लकी आहे की नीरज माझा नवरा आहे. जो मला, माझ्या स्वप्नांना आपलं मानतो.

– मृणाल दुसानिस