नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत बकिंमचंद्र चटर्जी लिखित ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत पुन्हा एकदा नव्या स्वरुपात देश बांधवांच्या भेटीला येत आहे. गायक – संगीतकार ऋग्वेद देशपांडे व  ‘युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप’ची प्रस्तुती असलेल्या या राष्ट्रभक्ती जागविणाऱ्या गीताचे प्रकाशन भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे पश्चिम येथील  युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपच्या कार्यालयात करण्यात आले.  
या नव्या गीतांचे संगीत ऋग्वेद देशपांडे  यांनी केले असून, संगीत संयोजन वरद खरे यांनी केले आहे. आघाडीचे गायक मंगेश बोरगावकर, अनघा ढोमसे आणि  ऋग्वेद देशपांडे यांनी या गीतात आपला स्वर मिसळला असून, सतारवादक शेखर राजे आणि प्रसाद रहाणे यांच्याबरोबर बासरीवादक डॉ. हिमांशू गींदे यांनी साथसंगत केली आहे. 
या गाण्याचे रेकॉर्डिंग ठाण्यात ऋग्वेद देशपांडे यांच्याच ‘आरडी म्युझिक’ या स्टुडिओत झाले असून, व्हिडिओ स्वरुपातील  गीत ‘युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप’ ने तयार केले आहे. या  व्हिडिओ  गीताचे दिग्दर्शन सुमेध समर्थ यांनी केले आहे. वंदे मातरम हे संपूर्ण काव्य आजच्या तरुणाईच्या विस्मरणात जाऊ नये आणि आपल्याला कलात्मकतेने आपल्या भारत मातेला वंदन करता यावे, असा दुहेरी हेतू या गाण्याच्या निर्मिती मागे आहे, असे संगीतकार  ऋग्वेद देशपांडे यांनी सांगितले. तर आजचे कलावंत आणि तरुणाई देशाविषयी खूपच सजग आहे आणि म्हणूनच हे देशाभिमान उंचावणारे  राष्ट्रीय गीत आम्ही देशबांधवासाठी 
विनामूल्य बहाल करीत आहोत, असे ‘युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप’च्या वतीने मंदार गुप्ते यांनी सांगितले.

vijaysinh mohite patil marathi news, vijaysinh mohite patil solapur lok sabha marathi news
मोहिते-पाटलांच्या महायुती नेत्यांशी गाठीभेटी, भाजप सावध; राजन पाटलांना प्रचारात जुंपले
jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास
Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…