08 December 2019

News Flash

वाणी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पणाआधी करायची हे काम

हे काम करत असताना वाणीने मॉडेलिंगला सुरुवात केली होती

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने ‘शूद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. मात्र चित्रपटातील भूमिकेमुळे वाणीने अनेकांच्या मनावर जादू करत स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली. तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली वाणी सध्या ‘वॉर’ चित्रपटातील हॉट लूकमुळे चर्चेत आहे.

मुंबईमध्ये येण्यापूर्वी वाणी कुटुंबीयांसोबत दिल्लीमध्ये राहत होती. तिचे वडिल शिव कपूर यांचा दिल्लीमध्ये फर्निचरचा बिझनेस असून ते एक एनजीओ सुद्धा चालवतात. तर आई डिम्पी कपूर दिल्लीमध्ये मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह म्हणून काम करते. या पूर्वी त्या एका शाळेमध्ये शिक्षिका होत्या. वाणीची बहिण नुपूरचे लग्न झाले आहे. ती लग्न करुन हॉलंडमध्ये स्थायिक झाली आहे. वाणीचे अभिनय क्षेत्रात करिअर करणे तिच्या वडिलांना मान्य नव्हते.

मुलींनी लवकर लग्न करुन संसार थाटावा असे वाणीच्या वडिलांचे मत असल्याचे वाणीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यामुळे तिच्या बहिणीला वयाच्या १८व्या वर्षीच लग्न करावे लागले. बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवणे वाणीला मान्य नव्हते. तिने अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करायचे ठरवले. वडिलांचा विरोध असतानाही वाणीच्या आईने तिला पाठिंबा दिला होता. वाणीचे दिल्लीमध्येच शिक्षण झाले. त्यानंतर तिने जयपूरच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये काही काळ इंटर्नशिप केली आणि त्यानंतर काही महिने आयटीसी हॉटेलमध्ये काम केले.

आणखी वाचा : प्रियांकाला लवकरच व्हायचय आई

काम करत असतानाच वाणीने मॉडलिंग करण्यास सुरुवात केली होती. मॉडेलिंग करत असतानाच वाणीला बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिने आत्ता पर्यंत केवळ तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय एका तमिळ चित्रपटामध्ये ही काम केले आहे. सध्या ती अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफसह ‘वॉर’ चित्रपटात दिसत आहे.

First Published on October 9, 2019 2:32 pm

Web Title: vani kapoor before an actress doing this work avb 95
Just Now!
X