‘कबीर सिंग’ या चित्रपटात मोलकरणीची छोटीशी भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री वनिता खरात सर्वांनाच्या लक्षात आहे. त्यावेळी तिच्या या भूमिकेने अनेकांची मने जिंकली होती. आता वनिता एका न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. तिने नववर्षाच्या पहिल्या दिवशी न्यूड फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले होते. पण वनिताचे हे न्यूड फोटोशूट पाहून तिच्या आईची किंवा कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय होती? असा प्रश्न अनेकांना पडला असेलच. वनिताने याबाबत वक्तव्य केले आहे.
वनिताने नुकताच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिचे न्यूड फोटो पाहून कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती हे सांगितले आहे. ‘खरंतर जेव्हा मी फोटोशूट केलं तेव्हा खूप भीती वाटत होती. कारण मी चाळीत राहणारी मुलगी आहे. त्यामुळे माझ्या शेजारी राहणारे, माझे कुटुंबीय कशी प्रतिक्रिया देतील मला माहिती नव्हतं. खरंतर मी घरी विचारलं नाही थेट सांगितलं की मी न्यूड फोटोशूट केलं आहे. थोडं घाबरले होते पण दुसऱ्यांकडून कळण्याआधीच मी घरी सांगितले होते’ असे वनिता म्हणाली.
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, ‘मी माझ्या आईला सांगितलं की एका कॅलेंडरसाठी मी न्यूड फोटोशूट केलं आहे. त्यावर माझी आई ठिक आहे असं म्हणाली. काही हरकत नाही. तो तुझ्या कामाचा भाग आहे. ते ऐकून मला दोन मिनिट वाटलं ही खरच माझी आई आहे ना जी काही वर्षांपूर्वी या क्षेत्रात जाण्यापूर्वी एकदा विचार कर असं मला म्हणत होती. ती आता मला इतका पाठिंबा देते. त्यानंतर मला इतका आनंद झाला की आता मला कोणी काहीही बोललं तरी काहीच फरक पडणार नाही. कारण माझे कुटुंबीय माझ्यासोबत आहेत.’
आणखी वाचा- “..म्हणून मी बोल्ड सीन करणार नाही”; गौहर खानने केलं स्पष्ट
अभिनेत्री वनिता खरातने एका कॅलेंडरसाठी हे फोटोशुट केलं आहे. आपल्या वजनाचा आणि शरीराबद्दलचा कोणताही न्यूनगंड न बाळगता वनिताने बोल्ड फोटो शेअर केले. “मला माझ्या गुणवत्तेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीरावर अभिमान आहे. कारण मी मी आहे…!!!,” अशा भावना वनिताने फोटो शेअर करत व्यक्त केल्या होत्या. वनिताने बॉडीशेम करणाऱ्यांना हे फोटोशूट करून संदेश दिला आहे. त्याचबरोबर #bodypositivity असा हॅशटॅगही वनिताने वापरला आहे. तिचं मराठी कलाकारांकडून आणि सोशल मीडियावर कौतूक होत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2021 12:42 pm