News Flash

‘छोटी मालकीण’मध्ये वर्षा दांदळेची धमाकेदार एण्ट्री

साकारणार आक्का आत्त्याची भूमिका..श्रीधर आणि छोटी मालकीण रेवती यांच्या नात्यात आक्का आत्या मीठाचा खडा टाकू पाहत आहे.

वर्षा दांदळे

आपल्या प्रभावी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेत्री वर्षा दांदळे स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेत एण्ट्री करत आहेत. श्रीधरच्या आत्याच्या भूमिकेत त्या दिसणार आहेत. त्यांच्या एण्ट्रीनं मालिकेचं कथानक कसं रंजक होतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आक्का आत्या म्हणजे विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे. जुन्या पिढीची असूनही नव्या काळाचं तिला चांगलंच भान आहे. ती व्हॉट्सअॅप-फेसबुकही वापरते. चित्रपटांची आवड असल्यानं मध्येच फिल्मीही होते. तिचा स्वभाव मात्र जरा चमत्कारिक आहे. चेष्टा करताना अचानक चिडते, चिडलेली असताना हसू लागते. तिच्या या विचित्र स्वभावामुळे ती खाष्ट वाटते. ही आक्का आत्या काही ना काही करून रेवतीला त्रास देण्याचा प्रयत्न करते. श्रीधरला रेवतीबद्दल काहीबाही सांगून चिथवण्याचा प्रयत्न करते. मात्र, आक्का आत्याच्या कारस्थानांना श्रीधर घाबरत नाही; उलट तो रेवतीलाच पाठिंबा देतो.

वाचा : आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार 

श्रीधर आणि छोटी मालकीण रेवती यांच्या नात्यात आक्का आत्या मीठाचा खडा टाकू पाहत आहे. आक्का आत्याच्या एण्ट्रीनं कथानक अधिक रंजक होणार आहे. आक्का आत्याची कारस्थानं श्रीधर कशी उधळून लावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 5:53 pm

Web Title: varsha dandale to enter in chhoti malkin star pravah serial as akka aatya
Next Stories
1 आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार
2 जिन्नाच्या फोटोला विरोध करणाऱ्यांनी गोडसेच्या मंदिरालाही विरोध करावा – जावेद अख्तर
3 लाईक्स मिळविण्याच्या नादात निया झाली ट्रोल
Just Now!
X