22 September 2020

News Flash

वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे यांचा ‘पियानो फॉर सेल’

या नाटकाच्या निमित्ताने ज्या दोन दिग्गज अभिनेत्री प्रथमच रंगभूमीवर एकत्र येत आहेत त्या आहेत वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे विज.

वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे

दोन दिग्गज कलाकार प्रथमच एकत्र आल्यावर जो काही अनुभव रसिक प्रेक्षक अनुभवतात तो प्रचंड आनंददायी असतो. मग हा अनुभव जर रंगभूमीवरचा असेल तर तो अधिक रंगतदार, स्वर्णिम ठरतो. त्या दिग्गजांचा अभिनय, त्यांच्यातली संवादांची जुगलबंदी, विषयाच्या आशयाला आणि सादरीकरणाला अतुलनिय उंचीवर पोहोचवते. अगदी हाच आणि असाच एक सुखद अनुभव सर्व रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत प्रस्तुतकर्ते चैतन्य गिरिश अकोलकर आणि डिज़िटल डिटॉक्स ही निर्मिती संस्था ‘पियानो फॉर सेल’ या नाटकाद्वारे. या नाटकाच्या निमित्ताने ज्या दोन दिग्गज अभिनेत्री प्रथमच रंगभूमीवर एकत्र येत आहेत त्या आहेत वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे विज.

लेखिका मेहेर पेस्तोनजी लिखित ‘पियानो फॉर सेल’ या मूळ इंग्रजी नाटकाचे नाट्य रुपांतर आणि दिग्दर्शन हे आशिष कुलकर्णी यांचे आहे. अत्यंत आगळ्यावेगळ्या विषयाच्या या नाटकाचे प्रयोग १ डिसेंबर २०१८ पासून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच परदेशातही करण्याचे प्रयोजन आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 3:55 pm

Web Title: varsha usgaonkar and kishori shahane working together in marathi play piano for sale
Next Stories
1 ‘सारे तुझ्याचसाठी’मध्ये बॉक्सिंग आणि शास्त्रीय संगीताचं बांधलं जाणार बंधन
2 ‘राष्ट्रीय पुरस्कार ही सर्वात मोठी जबाबदारी’
3 Shakeela biopic: अडल्ट स्टार शकीलाच्या रुपातील रिचाला पाहिलं का?
Just Now!
X