12 December 2017

News Flash

यासाठी वरुण- आलिया आले एकत्र

त्यांच्या चाहत्यांना हा फोटो फारच आवडला

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 4, 2017 6:30 PM

आलिया भट्ट आणि वरुण धवन

वरुण धवन आणि आलिया भट्ट यांची जोडी ‘स्टुडंट ऑफ दी इअर’ पासूनच हिट ठरली होती. या सिनेमानंतर दोघांनी ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या दोन सिनेमांमध्ये काम केले. हे तीनही सिनेमे सुपर हिट ठरले होते. पण या तीन सिनेमांनंतर दोघांनी एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला होता. प्रेक्षकांना नवी जोडी पाहता यावी म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला होता. पण आता त्यांना आपलाच नियम तोडावा लागला. दोघं पुन्हा एकदा चित्रीकरणासाठी एकत्र आले आहेत. पण हे कोणत्याही सिनेमाचे चित्रीकरण नसून एका जाहिरातीसाठी हे एकत्र आले आहेत.

Back on set with #dharma and @aliaabhatt. 4.0

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

धर्मा प्रोडक्शनने त्यांच्या सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो शेअर केला. या फोटोवरुन सुरूवातीला हे दोघे पुन्हा एकदा एकत्र सिनेमा करत आहेत की काय असा विचार त्यांच्या चाहत्यांच्या मनात आला. पण हा फोटो सिनेमाच्या सेटवरचा नसून एका जाहिराती संबंधीचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या चाहत्यांना हा फोटो फारच आवडला.

वरुणने आलियासोबतचा एक फोटो शेअर करताना लिहिले की, ‘पुन्हा एकदा धर्मा प्रोडक्शन आणि आलियासोबत काम करत आहे.’ पुनित मल्होत्राने या जाहिरातीचे चित्रीकरण केले असून शहराच्या स्वच्छतेवर ही जाहिरात भाष्य करणरी असेल हे त्यांच्या इन्स्टाग्रामवरील फोटो कॅप्शनवरुन कळते. पुनित आणि वरुणने शेअर केलेल्या या फोटोमध्ये आलियाने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे तर वरुण ‘काऊ बॉय’ लूकमध्ये पाहायला मिळतो. या जाहिरातीद्वारे वरुण आणि आलिया चौथ्यांदा एकत्र काम करत आहेत. त्यामुळे त्यांची ही जोडी चाहत्यांना फारच आवडते असेच म्हणावे लागेल.

अभिषेक वरर्मान दिग्दर्शित ‘शिद्दत’ या सिनेमात हे दोघे एकत्र दिसणार असल्याचे म्हटले जात होते. पण याबाबत अजून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. दोघांच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, वरुणचा ‘जुडवा २’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असून लवकरच हा सिनेमा १०० कोटींची कमाई करेल अशी चिन्हे आहेत. तर दुसरीकडे आलिया भट्टने मेघना गुलझार दिग्दर्शित ‘राझी’ या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याशी विवाह झालेल्या एका काश्मिरी मुलीची भूमिका ती या सिनेमात साकारणार आहे. हा सिनेमा हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कांदबरीवर आधारित आहे.

give me 30 seconds ✌️ 📸 @puneetbsaini

A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on

First Published on October 4, 2017 6:30 pm

Web Title: varun dhawan and alia bhatt are set to recreate their magic but with a twist see photos