News Flash

‘बद्रीनाथ की दुल्हनिया’चा ट्रेलर प्रदर्शित

आलियाची स्टाइलही हटके आहे

'बद्रीनाथ की दुल्हनिया' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

वरुण धवन आणि आलिया भट्ट यांचा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये तुम्हाला दोन जुन्या गाण्यांचे कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. या सिनेमात वरुण धवनचे नाव बद्रीनाथ उर्फ बद्री असे असते. बद्रीच्या प्रेमाचे वय सरलेले असते त्यामुळे त्याला आता सरळ लग्नच करायचे असते. पण आलिया मात्र त्याला लग्नासाठी नकार देते. यामुळेच या सिनेमात आलियाला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी वरुणने केलेली धडपड दिसून येते. वरुणला फारसे महत्त्व न देणारी आलिया नेहमीप्रमाणे स्क्रीनवर खुलून दिसते. तिची स्टाइलही हटके आहे.

ट्रेलरच्या एका दृश्यात वरुणला फोटोसाठी योग्य पोज आणि योग्य अँगल देण्यासाठी छायाचित्रकार त्याला सारखा बोलताना दाखवण्यात आले आहे. तर वरुण दीपिका पादुकोण आणि करीना कपूर यांच्या फोटोच्यामध्ये उभा राहिलेला दिसतो. छायाचित्रकार बद्रीला योग्य पोज द्यायला सांगत असतो. पण, आपल्या लग्नासाठी फोटो काढायला आलेल्या बद्रीला थोडे टेन्शन आलेले त्याच्या चेहऱ्यावरच दिसून येत असते. पण नंतर त्याला तो छायाचित्रकार फारच बोलतो त्यामुळे रागाने बद्री त्याच्यावर बूटच फेकतो.

काही दिवसांपूर्वी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाच्या पहिल्या टिझरमध्ये अभिनेता वरुण धवनचे एक वेगळेच रुप पाहायला मिळाले होते. या ट्रेलरमधील वरुणचे रुप पाहिले तर ते कोणत्याही सर्वसामान्य मुलाप्रमाणेच दिसत आहे. कोणत्याही हिरोची, विनोदी कलाकाराची झलक त्याच्या या नव्या लूकमधून पाहायला मिळत नाहीये. ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ हा सिनेमा ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’चा सिक्वल आहे. २०१४ मध्ये आलेला शशांक खैतान दिग्दर्शित ‘हम्टी शर्मा की दुल्हनियां’ हा सिनेमा चांगलाच हिट ठरला होता. तरुणाईने हा सिनेमा अक्षरश: डोक्यावर घेतला होता. आता ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ ला तरुणाई किती भरभरून प्रतिसाद देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 5:41 pm

Web Title: varun dhawan and alia bhatt starer badrinath ki dulhania trailer is out now
Next Stories
1 होय, मी गुपचूप लग्न केलंय- हुमा कुरेशी
2 ‘चाहूल’मध्ये रंगणार सर्जेरावच्या लग्नाचा सोहळा
3 लव्ह स्टोरीत रंगवलेल्या गाण्याची अजब कहाणी
Just Now!
X