News Flash

लग्नानंतर वरुण आणि नताशाचा ‘तो’ फोटो झाला व्हायरल

काय आहे त्या फोटोमध्ये?

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल काल अलिबागच्या ‘द मॅन्शन हाऊस’मध्ये विवाहबद्ध झाले. वरुण आणि नताशा शाळेत असल्यापासून परस्परांना ओळखत होते. पण कॉलेजच्या दिवसापासून त्यांच्यामध्ये प्रेमाचे नाते फुलण्यास सुरुवात झाली.

वरुण नताशाचं अलिबागमध्ये लग्न: ‘द मॅन्शन हाऊस’चं एका दिवसाचं भाडं ऐकून विस्फारतील डोळे

अखेर २४ जानेवारीला ते आयुष्यभरासाठी विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर आता वरुण-नताशाचे जुने फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. तेव्हा आणि आता, असे जुने आणि नवीन फोटो व्हायरल झाले आहेत. वरुण आणि नताशाच्या लग्नानंतर चाहत्यांनीच जुने आणि नवीन फोटो एकत्र करुन, व्हायरल केले आहेत. लग्नाचा आणि कॉलेजच्या दिवसांमधला फोटो एकत्र करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VARUN DHAWAN (@varundvn_gallery)

‘या’ दिवशी होणार लग्नाची रिसेप्शन पार्टी
काल (२४ जानेवारी) अलिबागमध्ये या दोघांनी थाटामाटात लग्नगाठ बांधली. करोना पार्श्वभूमीवर या लग्नसोहळ्याला केवळ ५० जणांचा आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, कलाविश्वातील अन्य सेलिब्रिटी आणि दिग्गजांसाठी लवकरच एका रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात येणार आहे. याविषयी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

करोना काळ असल्यामुळे वरुण आणि नताशा यांना अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. मात्र, लवकरच ते अन्य सेलिब्रिटींसाठी रिसेप्शन पार्टी देणार आहेत. पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये या पार्टीचं आयोजन करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 1:19 pm

Web Title: varun dhawan and natasha dalals then and now photo trends after their wedding dmp 82
Next Stories
1 All Set! ‘या’ दिवशी होणार वरुण-नताशाच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी
2 ‘ड्रेस घेण्यासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते’; कंगनाने शेअर केली ‘ती’ आठवण
3 करोनाचा फटका; ‘द कपिल शर्मा’ शो लवकरच होणार बंद?
Just Now!
X