24 January 2020

News Flash

वरुण धवन बनणार कुली

२५ वर्षांनंतर देवीड धवन आणि वाशू भगनानी पुन्हा एकदा एकत्र काम करणार

वरुण धवन

नव्वदच्या दशकात गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. विनोदी चित्रपटांची एक लाटच त्याकाळी आली आणि गोविंदा रातोरात सुपरस्टार विनोदी अभिनेता म्हणून लोकप्रिय झाला. त्यानंतर आपल्या समकालिनांप्रमाणे पुन्हा एकदा चित्रपटात नशीब आजमावून पाहण्याचा गोविंदाने केलेला प्रयत्न फसला असला तरी त्याच्या चित्रपटांची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळे गोविंदाच्या या चित्रपटांचे निर्माते वाशू भगनानी यांनी गोविंदाच्या गाजलेल्या चित्रपटापैकी एक म्हणजे ‘कुली नंबर १’चा रिमेक करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये कोणता अभिनेता काम करणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. चाहत्यांच्या ही उत्साह वाढवण्यासाठी चित्रपट व्यापर विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे ‘आज २४ एप्रिल, वरुण धवनच्या वाढदिवसा निमित्त आम्ही एक मोठी घोषणा करतोय’ असे ट्विट केले आहे.

त्यानंतर तरण आदर्शने ‘२५ वर्षांनंतर देवीड धवन आणि वाशू भगनानी पुन्हा एकदा त्यांची कॉमेडी घेऊन कुली नंबर १च्या रिमेकव्दारे येणार आहेत. या चित्रपटात अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या चित्रपटाचे चित्रीकरण ऑगस्ट २०१९मध्ये सुरू करण्यात येणार आहे. जुडवा चित्रपटाच्या यशानंतर देविड-वरुण पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस हादरवून टाकणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे’ असे ट्विट केले आहे. आता चाहते वरुण धवन आणि साराची ऑनस्क्रिन केमीस्ट्री पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत.

First Published on April 24, 2019 11:05 am

Web Title: varun dhawan and sara ali khan playing role in coolie number 1
Next Stories
1 Pokemon Detective Pikachu : ‘अॅश’ आणि ‘पिकाचू’ची जोडी आता मोठ्या पडद्यावर
2 ‘लेक्चर बंक’मध्येही एक मजा होती
3 ‘मी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला पण…’,सनी लिओनी झाली भावुक
Just Now!
X