27 February 2021

News Flash

‘स्त्री’ और’ रुही’को भेडिया का प्रणाम, वरुण धवनची जान्हवीला टक्कर

आगामी हॉरर कॉमेडी सिनेमाची घोषणा

‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी सिनेमाच्या यशानंतर लवकरच ‘रुही’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातच आता आणखी एका हॉरर कॉमेडी सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. दिनेश विजन यांच्या आगामी ‘भेडिया’ या सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. या सिनेमात वरुण धवन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. वरुण सोबत मुख्य अभिनेत्रीची भूमिका कृती सेनन साकारणार आहे.

वरुण धवनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या सिनेमाचा टीझर शेअर केलाय. “भेडिया का प्रणाम, स्त्री ओर रुही को” असं कॅप्शन देत वरुणने त्याच्या चाहत्यांना आगामी सिनेमाची बातमी दिलीय. 14 एप्रिल 2022 या सालात ‘भेडिया’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भेडिया’ सिनेमाच्या टीझरमध्ये पौर्णिमेच्या रात्री एक व्यक्ती लांडगा बनत असल्याचं दिसतंय. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

दिग्दर्शक अमर कौशिक यांचा हा तीसरा हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. कौशिक यांनी निर्माता दिनेश विजन यांच्यासोबत ‘स्त्री’ आणि ‘रुही’ या सिनेमांची निर्मिती केलीय.

https://www.loksatta.com/manoranjan-news/ruhi-movie-first-song-out-janvhi-kapoor-and-rajkumar-rao-dance-viral-kpw89-2405702/

जान्हवी कपूरनेदेखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भेडिया’ सिनेमाचा टीझर पोस्ट केलाय. “रुही अपनी डरावनी दुनिया मे स्वागत करती है भेडिया का” असं कॅप्शन तिने व्हिडीओला दिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

‘1992 सालात आलेल्या महेश भट्ट यांच्या ‘जुनून’ सिनेमातही एक तरुण पौर्णिमेच्या रात्री वाघ बनत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. अभिनेता राहुल रॉयने या तरुणाची भूमिका साकारली होती. त्याकाळात ‘जुनून’ सिनेमा चांगलाच लोकप्रिय ठरला होता. टीझरवरुन ‘भेडिया’ सिनेमा हॉरर वाटत असला तरी सिनेमात हॉररसोबत कॉमेडीचा तडका पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 3:53 pm

Web Title: varun dhawan annoused his upcoming horror comedy movie bhedia with costar kriti sanon kpw89
Next Stories
1 …म्हणून राखी सावंतने मानली हार; १४ लाख घेत सोडलं बिग बॉसचं घर
2 स्वातीच्या घरी लग्नाची धामधूम! संग्रामसोबत बांधणार लग्नगाठ
3 ‘भुलभुलैया-2’च्या प्रदर्शनाची घोषणा,अक्षय कुमार नाही तर कार्तिक करणार धमाल
Just Now!
X