19 November 2017

News Flash

…म्हणून करणने वरुण धवनला ‘बाहुबली ३’ साठी नकार दिला

करणने त्याच्या 'स्टुण्डंट ऑफ दि इयर' या सिनेमातून वरुणला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 17, 2017 6:39 PM

आयफा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या दिमाखदार सोहळ्याला अनेक तारे- तारकांनी आवर्जुन हजेरी लावली होती. वरुण धवनला पहिल्यांदा विनोदी कलाकाराचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना तो थोडा भावूक झाला होता. ‘माझ्याच भावाने दिग्दर्शन केलेल्या सिनेमासाठी पुरस्कार मिळणं ही गोष्ट माझ्यासाठी फार खास आहे. त्यामुळे मी हा पुरस्कार मी त्यालाच अर्पण करतो,’ असे सांगितले.

वरुणला स्वतःची चॉकलेट बॉयची इमेज बदलायची आहे. आतापर्यंत त्याने अनेक विनोदीपटांमध्ये काम केले. पण आता त्याला वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमांमध्ये काम करायचे आहे. यासाठी त्याने निर्माता- दिग्दर्शक करण जोहरकडेच धाव घेतली. तू तुझ्या आगामी ‘बाहुबली ३’ सिनेमात मला घेशील का अशी विचारणा वरुणने करणकडे केली.

‘टन टना टन’वर ‘जुडवा’ स्टार थिरकले

करणने त्याच्या ‘स्टुण्डंट ऑफ दि इयर’ या सिनेमातून वरुणला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले होते. त्यामुळे करणला वरुणबाबत नेहमीच जिव्हाळा राहिला आहे. अशात तो ‘बाहुबली ३’ साठी वरुणचा नक्कीच विचार करेल असे सर्वांना वाटत होते. पण प्रत्यक्षात मात्र तसे काही झालेच नाही. करणने ‘बाहुबली ३’ सिनेमात काम मिळवून देण्यासंदर्भात वरुणला स्पष्ट नकार दिला.

गेल्या काही वर्षांमध्ये वरुण कुठल्या न कुठल्या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असल्यामुळे त्याला आयफा पुरस्कार सोहळ्यांना उपस्थित राहायला मिळाले नव्हते. त्यामुळए यंदाचे आयफा पुरस्कारांचे त्याचे हे पहिलेच वर्ष होते. पहिल्याच वर्षात त्याला पुरस्कार मिळाल्यामुळे सध्या तो भलताच खूश आहे.

जाणून घ्या भारतात कधी आणि किती वाजता प्रदर्शित होणार ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा नवा सिझन

लवकरच वरुण १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या जुडवा या सिनेमाच्या सिक्वलमध्ये दिसणार आहे. डेव्हिड धवन यांचे दिग्दर्श असलेल्या या सिनेमात सलमान खानही छोटेखानी भूमिका साकारताना दिसणार आहे. वरुणसोबत या सिनेमात तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आयफा सोहळ्यात सलमान आणि वरुणने ‘टन टना टन’ या गाण्यावर एकत्र डान्सही केला. त्यांच्या या डान्सला प्रेक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता ‘जुडवा २’ सिनेमा नक्की कसा असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली आहे.

First Published on July 17, 2017 6:39 pm

Web Title: varun dhawan asked karan johar to cast him in bahubali 3 if it might happen but director refused