News Flash

Video : वरुण धवनच्या गाडीखाली आला फोटोग्राफरचा पाय अन्…

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सेलिब्रिटींचे फोटो काढण्यासाठी चाहत्यांसोबतच फोटोग्राफर्सचीही धडपड सुरू असते. या धडपडीचा फटका एका फोटोग्राफरला बसला. अभिनेता वरुण धवन त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल हिच्यासोबत गाडीमधून येत होता. त्यावेळी त्याचे फोटो काढण्यासाठी गाडीसमोर फोटोग्राफर्सची गर्दी जमली होती. या गर्दीत वरुणच्या गाडीखाली एका फोटोग्राफरचा पाय आला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गाडी पायावरून जात असतानाच फोटोग्राफरचा आवाज ऐकून वरुणने लगेचच ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितलं. यानंतर वरुण त्या फोटोग्राफर्सवर चिडताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. “मी प्रत्येकवेळी तुम्हाला माझे फोटो काढू देतो. तरीसुद्धा इतकी धडपड करण्याची काय गरज आहे”, असं तो त्या फोटोग्राफर्सना म्हणताना दिसतोय. त्यानंतर तो फोटोसाठी पोझसुद्धा देतो आणि पोझ देताना त्या फोटोग्राफरचा पाय ठीक आहे का याची विचारपूस करताना दिसत आहे.

वरुणच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच ‘कुली नंबर १’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत सारा अली खानची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुणचे वडील डेविड धवन करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2020 7:18 pm

Web Title: varun dhawan car goes over cameramans leg the actor comes to his rescue watch video ssv 92
Next Stories
1 आंबे कसे खाता याऐवजी रात्री शांत झोप कशी लागते हे विचारा; ‘दंगल गर्ल’चा सणसणीत टोला
2 होय मी प्लास्टिक सर्जरी केली आणि मला त्याची लाज वाटत नाही; श्रुती हासनचं ट्रोलर्सना उत्तर
3 ठरलं तर! इभ्रत ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X