22 January 2021

News Flash

शूटिंगदरम्यान वरुण धवनला करोनाची लागण

'जुग जुग जिओ' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुणला करोनाची लागण

अभिनेता वरुण धवनला करोनाची लागण झाली आहे. वरुणने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. आगामी ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुणला करोनाची लागण झाली. या चित्रपटात वरुणसोबतच नीतू कपूर, अनिल कपूर, कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

चित्रपटाच्या टीमसोबत व्हिडीओ कॉलवर बोलतानाचा स्क्रिनशॉट वरूणने पोस्ट केला. त्यासोबत लिहिलं, ‘करोना काळात काम करत असताना मला करोना व्हायरसची लागण झाली. निर्मात्यांकडून सर्व काळजी घेण्यात आली होती पण आयुष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या.’

आणखी वाचा : सलमानच्या बहिणीने दुबईतल्या हॉटेलमध्ये फोडल्या प्लेट्स; व्हिडीओ व्हायरल

नीतू कपूरसुद्धा शूटिंगवरून मुंबईला परतल्या. त्यांना परत आणण्यासाठी रणबीर कपूरने योग्य ती प्रवासाची सोय केली. तर वरुण चंदीगडमध्येच क्वारंटाइनमध्ये राहत आहे. वरुणसोबतच चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता चंदीगडमध्येच आहेत. ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 2:13 pm

Web Title: varun dhawan confirms testing positive for covid 19 ssv 92
Next Stories
1 अभिनेता मनीष पॉलला करोनाची लागण
2 बॉलिवूडकरांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, म्हणाले…
3 ब्रेन स्ट्रोकच्या झटक्यानंतर पहिल्यांदा समोर आला राहुल रॉयचा व्हिडीओ, म्हणाला…
Just Now!
X