27 September 2020

News Flash

पुण्यात शूटिंगदरम्यान मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला वरुण धवन

सुरक्षेची पुरेपूर काळजी घेऊनसुद्धा हा स्टंट फसला होता.

वरुण धवन

अभिनेता वरुण धवन ‘कूली नंबर १’ या चित्रपटाचे शूटिंग करत असताना मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला. चित्रपटातील एका स्टंटचे चित्रीकरण असताना टेकडीच्या कड्यावर वरुणची गाडी अडकली होती आणि गाडीचा दरवाजा उघडत नव्हता. पुण्यात हे शूटिंग सुरू होते.

टेकडीच्या कड्यावर गाडी अडकली आहे, अशाप्रकारचं हे दृश्य होतं. त्या गाडीतून वरुणला बाहेर यायचं होतं. सुरक्षेखातर शूटिंगपूर्वी अनेकदा या स्टंटचा सरावसुद्धा करण्यात आला होता. पण ऐनवेळी वरुण कड्यावर गाडीत अडकला आणि गाडीचा दरवाचा बंद झाला.

आणखी वाचा : ‘अर्जुन रेड्डी’ फेम विजय देवरकोंडाने घेतलं इतक्या कोटींचं घर; पाहा फोटो

‘गाडी टोकावर होती आणि त्यातून वरुणला बाहेर काढणं मोठं आव्हान होतं. मात्र अशा परिस्थितीतही वरुण शांत व संयमी होता. स्टंट साहाय्यकाच्या मदतीने अखेर वरुणला गाडीबाहेर काढण्यात यश आलं,’ अशी माहिती ‘मिड डे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली. सुरक्षेची पुरेपूर काळजी घेऊनसुद्धा हा स्टंट फसला होता. मात्र सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.

नव्वदच्या दशकात प्रदर्शित झालेल्या गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ चित्रपटाचा हा रिमेक असून यामध्ये वरुणसोबत सारा अली खान मुख्य भूमिका साकारणार आहे. वरुणचे वडील डेविड धवन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून १ मे २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 3:41 pm

Web Title: varun dhawan gets stuck in car hanging over the cliff during action sequence in pune ssv 92
Next Stories
1 सनी लिओनी फेसबुकवर ठरली ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस ऑफ बॉलिवूड’
2 नाचता येईना अंगण वाकडे; प्रकाश राज यांचा भाजपाला टोला
3 प्रियांका-निकच्या घरी आला नवा पाहुणा, पाहा व्हिडीओ…
Just Now!
X