News Flash

फर्स्ट लूक : ‘बदलापूर’

श्रीराम राघवनच्या 'बदलापूर' या आगामी 'अॅक्शन-थ्रिलर' चित्रपटाचा 'फर्स्ट लूक'...

| November 28, 2014 01:31 am

श्रीराम राघवनच्या ‘बदलापूर’ या आगामी ‘अॅक्शन-थ्रिलर’ चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ प्रसिध्द झाला आहे. चित्रपटातील प्रमुख अभिनेता वरुण धवनने चित्रपटाचे पोस्टर टि्वटर या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती कोण आहेत हे ओळखता येत नसले, तरी पोस्टरमधील दृष्य गुढ स्वरुपाचे असल्याचे जाणवते. सैफ अली खान आणि दिनेश विजन हे या मल्टी-स्टारर चित्रपटाचे निर्माते असून, चित्रपटात नवाज उद्दीन सिद्दीकी, हुमा कुरेशी, वरुण धवन, यामी गौतम, दिव्या दत्ता, विनय पाठक आणि कोको इत्यादींच्या भूमिका आहेत. चित्रपटात काही बोल्ड दृष्ये असल्याचेदेखील बोलले जात आहे. ‘स्टुडण्ट ऑफ दी इयर’ चित्रपटाद्वारे वरुण धवनला लाँच करणाऱ्या करण जोहरनेदेखील ‘बदलापूर’ चित्रपटाचे फर्स्ट लूक शेअर केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2014 1:31 am

Web Title: varun dhawan huma qureshi starrer badlapurs poster revealed
Next Stories
1 आज चंपाषष्ठी!
2 व्हिडिओः ‘हॅप्पी जर्नी’ म्हणजे तरल फँटसीपट
3 सतरंगी ससुराल ३ डिसेंबरपासून झी वाहिनीवर
Just Now!
X