22 September 2020

News Flash

‘बदलापूर’मध्ये वरुणचा अँग्री मॅन लूक

'स्टुडन्ट ऑफ द इयर' चित्रपटाने पदार्पण करणारा अभिनेता वरुण धवन हा आतापर्यंत रोमॅण्टिक हिरोच्या भूमिकेत झळकला आहे.

| December 1, 2014 03:16 am

‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ चित्रपटाने पदार्पण करणारा अभिनेता वरुण धवन हा आतापर्यंत रोमॅण्टिक हिरोच्या भूमिकेत झळकला आहे. मात्र, नुकताच ‘बदलापूर’ या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. या पोस्टरमध्ये वरुणचा एक वेगळा लूक पाहावयास मिळाला. यात वरुणला दाढी-मिशा असून तो खूपच रागात दिसत आहे. हा त्याचा रफ आणि डेडली लूक प्रेक्षकांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे नाव आणि वरुणचा हा लूक पाहिल्यानंतर चित्रपटात अनेक अॅक्शन सीन्स पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चित्रपटात वरुणसह नवाजुद्दीन सिद्दीकी, हुमा कुरैशी, यामी गौतम, दिव्या दत्ता आणि राधिका आपटे यांच्या भूमिका आहेत.
varun-badlapur-embed

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 3:16 am

Web Title: varun dhawan is fierce fiery and forceful in badlapur first look
Next Stories
1 जीवनात थोडा गडबड-गोंधळ हवाच – अमिताभ बच्चन
2 CELEBRITY BLOG : पॉलिटिक्स!
3 एका प्रवासाचं मनोगत
Just Now!
X