25 February 2021

News Flash

Corona Effect: वरुण धवनचं लग्न गेलं लांबणीवर

करोनाचा फटका सेलिब्रिटींच्या लग्नांनाही बसतोय

करोना व्हायरसमुळे जगभरातील लोक त्रस्त आहेत. १०० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषामुळे हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. करोना विषाणूचा फटका अगदी मनोरंजन क्षेत्रापासून आर्थिक क्षेत्रापर्यंत सर्वांनाच बसला आहे. अनेक मोठ मोठे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अगदी अभिनेता वरुण धवनला देखील आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे.

वरुण धवन आणि नताशा दलाल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. येत्या जुलै महिन्यात हे सेलिब्रिटी जोडपे लग्न करणार असे म्हटले जात होते. मात्र करोना विषाणूमुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार वरुण धवन थाईलंडमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार होता. त्यानंतर जोधपूर आणि मुंबईमध्ये रिसेप्शन पार्टी आयोजित केली जाणार होती. मात्र करोना विषाणूने त्याचे नियोजन चौपट केले.

वरुण सोबतच अभिनेत्री रिचा चड्ढा हिने देखील आपले लग्न लांबणीवर ढकलले आहे. ती अभिनेता अली फजलसोबत येत्या एप्रिल महिन्यात लग्न करणार होती. मात्र त्यांच्याही लग्नाची तारीख करोना विषाणूमुळे पुढे ढकलण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 5:28 pm

Web Title: varun dhawan natasha dalal and richa chadha ali fazal postpone weddings due to coronavirus mppg 94
Next Stories
1 शशांक केतकरने घेतली डोंबिवलीत पिशवी विकणाऱ्या आजोबांची भेट
2 संजीवनीच्या आयुष्यातील सत्य होणार उघड; रणजीत कोणता घेईल निर्णय ?
3 Video : श्रेयसचा पहिला हिंदी म्युझिक अल्बम अन् थेट परदेशात चित्रीकरण
Just Now!
X