बॉलिवूडचा स्टार हिरो म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या वरुण धवनच्या ‘ऑक्टोबर’ सिनेमाचे पोस्टर याआधीच प्रदर्शित करण्यात आले आहे. तर आता तुम्ही म्हणाल की, मग ही ५० पोस्टर्स कुठली आहेत. वरुणने त्याच्या ट्विटर अकाऊंट हँटडलवरुन एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये ‘ऑक्टोबर’ सिनेमाचे अनअधिकृत पोस्टर्स तयार करण्यात आले आहे. या पोस्टर्सना वरुणने एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर आणले आहे. वरुणच्या चाहत्यांनी अनेक सॉफ्टवेअरचा वापर करन फोटोशॉपद्वारे हा व्हिडिओ तयार केला आहे. सुजीत सरकार दिग्दर्शित ‘ऑक्टोबर’ सिनेमाचे सध्या चित्रीकरण सुरू असून १३ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये वरुण थोड्या वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.
Here is 50 Posters Of #October Made By Different Different Varuniacs from all over the World 🙂
Excitement is on its Peak
All The Best Team & Hope You Like it @Varun_dvn @BanitaSandhu @ShoojitSircar @ronnielahiri3 MONTHS TO OCTOBER pic.twitter.com/TvktPLV0CP
— Varun Dhawan Fan (@Adarsh_dvN) January 13, 2018
‘ऑक्टोबर’ सिनेमातून बनिता संधू बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. लंडनमध्ये राहणारी बनिता केवळ १८ वर्षांची आहे. पंजाबी कुटुंबात जन्मलेली बनिता ११ वर्षांची असल्यापासून अभिनय करतेय. यापूर्वी ‘डबलमिंट’च्या ‘एक अजनबी हसीना से’ या गाण्यात ती दिसली होती. आतापर्यंत वरुणचे सिनेमे पाहिले तर तो मसालापट सिनेमा करण्याला नेहमी प्राधान्य देताना दिसला आहे. असे असतानाही त्याला सुजीत सरकार यांच्या सिनेमात काम करण्याची संधी कशी मिळाली, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला होता. पण आश्चर्य म्हणजे जेव्हा वरुणला सुजीत आगामी सिनेमासाठी अभिनेत्याच्या शोधात आहे असे कळले तेव्हा तो सुजीत यांच्याकडे गेला आणि या सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
सिनेमाबद्दल बोलताना सुजीत म्हणाले की, ”पिकू’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान एकदा वृत्तपत्र वाचत असताना एका बातमीकडे माझी नजर गेली आणि मला ‘ऑक्टोबर’ सिनेमाची कथा सुचली. प्रेक्षकांना या सिनेमाची कथा आवडेल अशी मला खात्री आहे.’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2018 6:19 pm