अनेक तरुणींच्या मनावर राज्य करणारा बॉलिवूड अभिनेता म्हणजे वरुण धवन. वरुण धवन आज २४ एप्रिलला त्याचा ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘कलंक’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वरुणने कोणत्याही चित्रपटाचे शुटिंग सुरु केले नाही. वरुण सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. त्यादरम्यान वरुण त्याचा वाढदिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी त्याच्या शाळेतील मित्रांसह थायलंडला गेला असल्याचे समोर आले आहे.

सूत्रांनुसार वरुण आणि त्याचे मित्र थायलंडमध्ये फिरण्याबरोबरच तेथील प्रसिद्ध खेळ मुअय थाय (थाय बॉक्सिंग)च्या प्रशिक्षणाचे धडे घेणार आहेत. वरुण धवनला खेळ प्रचंड आवडातात. त्याला त्याच्या वाढदिलसा निमित्ता इतरांपेक्षा काही वेगळे करायचे आहे. म्हणून वरुण मित्रांसह थाय बॉक्सिंग शिकणार आहे. त्यानंतर वरुण थायलंडमधील सुमुद्र किनारे आणि तेथील सर्वात लोकप्रिय खाद्यांचा अस्वाद घेणार आहे.

murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
girl Bangladesh sexually assaulted,
डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात दोन भावांकडून बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा

थायलंडमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर वरुण भारतात परतणार आहे. परतल्यानंतर तो रेमो डिसूजाच्या ‘स्ट्रीट डान्सर ३डी’ चित्रपटाचे पुन्हा चित्रीकरणास सुरुवात करणार आहे. या चित्रपट वरुण धवनसह अभिनेत्री श्रद्धा कपूर, प्रभूदेवा आणि नोरा फतेही देखील झळकणार आहेत. या चित्रपटानंतर वरुण धवन ‘कुली नंबर १’ चित्रपटाच्या रिमेक मध्ये काम करणार आहे. हा चित्रपट देवीड धवन आणि वाशू भगनानी निर्माती असणार आहे. तसेच या चित्रपटात वरुणसह अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.