आलिया भट्ट आणि वरुण धवन यांची मैत्री तशी जुनीच. ‘स्टुण्डट ऑफ दि इयर’ या सिनेमातून हे दोघं पहिल्यांदा सिनेसृष्टीत दाखल झाले. सध्याच्या हॉट कपलपैकी एक. ‘स्टुण्डट ऑफ दि इयर’, ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ या सिनेमात ते एकत्र दिसले होते. याशिवाय अवॉर्ड्स कार्यक्रमात ते एकत्र नृत्य करताना अनेकदा दिसतात. नुकतीच त्यांनी ड्रीम टीम टूर केली. यातही त्यांनी अनेक गाण्यांवर एकत्र नृत्य केले.
‘बद्रीनाथ की दुल्हनिया’चे शुटिंग सध्या सुरु आहे. दिग्दर्शक शशांक खैतान दिग्दर्शित ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ सिनेमाचा हा सिक्वेल असणार आहे. या सिनेमातला वरुण धवनचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. शुटिंगमध्ये वरुण बाईक चालवताना दिसत आहे. वरुण बाईकवरून एका मित्रासोबत जयपूरच्या रस्त्यावरून जात आहे. तो रॉयल एनफिल्ड मोटारसायकलवरुन जाताना एकदम टफ लूकमध्ये दिसत आहे. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा सिनेमा मार्च २०१७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
काही दिवसांपूर्वी आलियाने वरुणसोबतचा एक फोटो इन्स्ट्राग्रामवर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये वरुण आणि आलिया एकत्र दिसत आहेत. यात वरुणची नजर बाहेर आहे तर आलिया मात्र त्याच्याकडेच एकटक पाहत आहे. हा फोटो काढताना तिच्या मनात कोणते विचार सुरू होते ते तिचेच तिला माहित. या फोटोला तिने छान कॅप्शनही दिले होते. तिने लिहिले की, ‘प्रेप टाइम फॉर बद्री अॅण्ड द दुल्हनिया’ नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असणारी आलिया तिच्या फॅन्ससाठी सतत काहीना काही व्हिडिओ आणि फोटोज पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वी तिने अक्षय कुमारच्या रुस्तम सिनेमाला प्रोत्साहन देणारा एक व्हिडिओ शुट केला होता. त्या व्हिडिचो सिनेवर्तुळात बरीच चर्चा झाली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2016 7:43 pm